esakal | वाचा... वसतिगृह शुल्कासाठी विद्यार्थ्यांची अशी होतेय अडवणूक...
sakal

बोलून बातमी शोधा

संग्रहीत छायाचित्र

कोरोनाच्या काळात विद्यार्थी हॉस्टेल, महाविद्यालयीन शिक्षण सोडून गावाकडे गेले. अजूनही महाविद्यालय बंदच आहेत. लॉकडाऊनच्या काळात शेतकऱ्यांनी पिकवलेला भाजीपाला, फळे व्यापार, विक्री अभावी शेतात सडून गेली. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले 

वाचा... वसतिगृह शुल्कासाठी विद्यार्थ्यांची अशी होतेय अडवणूक...

sakal_logo
By
संदीप लांडगे

औरंगाबाद ः महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी मराठवाड्यातील अनेक विद्यार्थी औरंगाबादेत येतात. शहरात अनेक ठिकाणी हे विद्यार्थी शासकीय, खासगी वसतिगृहांत राहून अभ्यास करतात. यंदा कोरोनामुळे परीक्षा न झाल्यामुळे ते मार्चमध्येच आपापल्या गावी गेले होते. या विद्यार्थ्यांना मार्च ते जुलैच्या शुल्कासाठी वसतिगृहचालकांकडून तगादा लावण्यात येत आहे. यामुळे विद्यार्थी, पालक हवालदिल झाले आहेत. 

मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादेत विविध जिल्ह्यातील विद्यार्थी महाविद्यालयीन, उच्चशिक्षण व स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी येतात. हे विद्यार्थी शहरातील बीडबायपास, उस्मानपुरा, विद्यापीठ, सातारा परीसर अशा विविध भागात असलेल्या शासकीय, निमशासकीय व खासगी वसतिगृहांत राहून परीक्षेची तयारी करतात. यंदा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मार्चपासून देशभरात लॉकडाउन करण्यात आले. 

होय, मृत्यू जवळ आला की हत्ती करतो आत्महत्या, वाचा रंजक माहिती  

तसेच शाळा, महाविद्यालय, स्पर्धा परीक्षाही रद्द करण्यात आल्या. कोरोना व एप्रिलपासून उन्हाळ्याच्या सुट्या असल्यामुळे विद्यार्थीही आपापल्या गावी गेले होते. औरंगाबाद कोरोनाचे हॉटस्पॉट बनल्याने अद्याप शाळा, महाविद्यालये बंद आहेत. असे असताना आता शहरातील खासगी वसतिगृहचालकांकडून विद्यार्थ्यांना एप्रिल, मे, जून व जुलैच्या शुल्काबाबत तगादा सुरू करण्यात आला आहे. शुल्क न भरल्यास वसतिगृहातील पुस्तके, साहित्य जप्त करण्याची धमकी देण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थी, पालकही हवालदिल झाले आहेत. याबाबत शासनाने कठोर पावले उचलत जबरदस्तीने शुल्क वसुलीची धमकी देणाऱ्या वसतिगृहचालकांवर कारवाई करण्याची मागणी विद्यार्थी संघटनेकडून करण्यात येत आहे. 

या आवडत्या पक्षापासून माणसांना भिती अॅलर्जी, दम्याची : वाचा....

शेतकऱ्यांच्या अवस्था बिकट
कोरोनाच्या काळात विद्यार्थी हॉस्टेल, महाविद्यालयीन शिक्षण सोडून गावाकडे गेले. अजूनही महाविद्यालय बंदच आहेत. लॉकडाऊनच्या काळात शेतकऱ्यांनी पिकवलेला भाजीपाला, फळे व्यापार, विक्री अभावी शेतात सडून गेली. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यातच मुलांना हॉस्टेलकडून शुल्काबाबत विचारणा करण्यात येत आहे. एका विद्यार्थ्यांकडून एप्रिल ते जुलै या चार महिन्यांचे आठ ते दहा हजार रुपये कुठून आणावेत, असा प्रश्न आता शेतकरी पालकांना पडला आहे. 

औरंगाबाद येथील थरार : भिंतीवरून उडी मारली अन् पडला वाघाच्या पिंजऱ्यात 

शासन आदेशाला 
केराची टोपली
 
कोरोनामुळे राज्यातील अनेक उद्योगधंदे, व्यवहार, व्यापार थंड झाले आहेत. त्यामुळे घरभाडे, विद्यार्थ्यांकडून होस्टेलचे शुल्क घेण्यात येऊ नये, असे शासनाचे आदेश आहे. मात्र, शासनाच्या या आदेशाला केराची टोपली दाखवत काही खासगी वसतिगृहचालकांकडून विद्यार्थ्यांकडे एप्रिल, मे, जून व जुलै महिन्यांच्या शुल्कासाठी तगादा लावण्यात येत आहे. या चार महिन्यांच्या काळात विद्यार्थी आपापल्या गावी होते. 


माझी मुलगी औरंगाबाद येथील महाविद्यालयात बी.एस्सीचे शिक्षण घेते. कोरोनामुळे मार्चपासून होस्टेल सोडून ती गावी राहायला आली आहे. आता होस्टेलचालक जुलैपर्यंतचे पैसे मागत आहेत. एप्रिल, मे महिन्यात विद्यार्थ्यांना सुट्या असतात. तसेच कोरोनामुळे महाविद्यालये अजून बंदच असताना होस्टेलचालक शुल्कासाठी वारंवार फोनवरून तगादा लावत आहे. 
-अजय जाधव (शेतकरी, कन्नड) 

loading image