भरधाव बसच्या धडकेत शेतकरी ठार,औरंगाबाद-सोलापूर महामार्गावरील घटना | Aurangabad Accident | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad Accident

भरधाव बसच्या धडकेत शेतकरी ठार,औरंगाबाद-सोलापूर महामार्गावरील घटना

आडुळ (जि.औरंगाबाद ) : शेतातून गायीचे दुध काढुन घरी येत असताना भरधाव बसने दुचाकीस्वार शेतकरी यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यात दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील आडुळ (ता.पैठण) फाट्यावर सोमवारी (ता.नऊ) रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. सुभाष शेषराव पिवळ असे मृत शेतकरी याचे नाव आहे. सुभाष शेषराव पिवळ (वय ४४, रा.आडुळ बु., ता.पैठण) हे शेतकरी सोमवारी संध्याकाळी आपल्या शेतात असलेल्या गायीचे दुध काढुन परत घराकडे येत होते. (Farmer Died In Accident On Aurangabad Solapur Highway)

हेही वाचा: आनंद महिंद्रांनी पाळला शब्द,'मदर्स डे'ला 'इडली अम्मा'ला दिले नवीन घर

औरंगाबाद-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावरुन आडुळकडे वळत असताना त्यांच्या दुचाकीला (एमएच २० एफएम ९७२३) पाचोडकडुन औरंगाबादकडे जाणारी औरंगाबाद (Aurangabad) आगाराची सोलापूर-औरंगाबाद बसने (एमएच २० बीआय २३६५) दुचाकीला जोराची धडक दिली.यात दुचाकीचा चुराडा होऊन दुचाकीस्वार सुभाष पिवळ हे जागीच ठार झाले.

हेही वाचा: 'तू मिसळ महोत्सव घे, मी नक्की येईन'; राज ठाकरेंचं वसंत मोरेंना आश्वासन

अपघाताची माहिती मिळताच आडुळ येथील नागरिकांनी मदत कार्य केले. या अपघाताची पाचोड पोलीस ठाण्यात नोंद घेण्यात आली असून पुढील तपास ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली जगन्नाथ उबाळे, रविंद्र क्षीरसागर करीत आहेत.

Web Title: Farmer Died In Accident On Aurangabad Solapur Highway

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top