esakal | एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्यासह कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

imtiaz jaleel

औरंगाबादेतील रेल्वेस्टेशन उड्डाणपुलावरील खड्ड्यांमध्ये बसून आंदोलन करुन जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्यासह पक्षाच्या ६० ते ७० कार्यकर्त्यांवर वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्यासह कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल

sakal_logo
By
सुषेन जाधव

औरंगाबाद: शहरातील रेल्वेस्टेशन उड्डाणपुलावरील खड्ड्यांमध्ये बसून आंदोलन करुन जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्यासह पक्षाच्या ६० ते ७० कार्यकर्त्यांवर वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

हेही वाचा- मध्य प्रदेशच्या भाचीला ६ वर्षांनी सापडली महाराष्ट्रात मामी, एका फोनवर पोलिसांनी

खासदार जलील यांच्यासह कार्यकर्त्यांनी गर्दी जमवत उड्डाणपुलावर सोमवारी (ता.७) खड्ड्यांमध्ये बसून महापालिका आयुक्त मुर्दाबाद, महापालिकेचे करायचे काय, खाली मुंडके वर पाय आदि घोषणा देत आंदोलन केले होते.  प्रकरणात वेदांतनगर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक प्रमोद देवकते यांनी फिर्याद दिली होती. 

खड्ड्यांमध्ये प्रतीकात्मकरीत्या झाडे लावून निषेध करत बॉम्बशोधक पथकाप्रमाणे येथे कार्यकर्त्यांनी पीपीई कीट घालून उड्डाणपुलावरील खड्डे शोधले, दरम्यान वाहतूकीचा खोळंबाही झाला होता. 

हेही वाचा- कचऱ्याप्रमाणे व्हेंटीलेटर जिल्ह्यात टाकू दिले, खासदार जलील असे का म्हणाले?

यांच्यावर गुन्हे दाखल
या प्रकरणात खासदार जलील यांच्यासह एमआयएमचे शहर जिल्हाध्यक्ष अब्दूल समीर साजेर बिल्डर, जिल्हा अध्यक्ष अरुण बोर्डे, मुन्शी पटेल, नासेर सिद्धीकी, रफीक चित्ता, आरेफ हुसैन, सांडू इसाक हाजी, गंगाधर ढगे, गजानन उगले पाटील, जमीर अहेमद काद्री, अनिस शेख, मुदस्सीर अन्सारी  यांच्यासह ६० ते ७० कार्यकर्त्यांविरोधात कलम १८८, महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१), (३), जमावबंदी आदेश, तसेच कलम १४४ (१), (३) लागू केलेले असतानाही उल्लंघन केल्याने गुन्हा दाखल झाला आहे.

हे वाचलंत का- तिला म्हणाले, प्राध्यापकाची नोकरी लावतो, १७ लाखही उकळले, शेवटी तिनेच... 

loading image