esakal | नोकरीचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार, औरंगाबादेत गजबजलेल्या भागातील धक्कादायक घटना
sakal

बोलून बातमी शोधा

3crime_201_163

नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून त्याने तिला रामगिरी हॉटेलजवळील स्टॉपवर बोलाविले. ती तेथे आली तेव्हा रात्रीचे नऊ वाजले होते. त्याने तिला कारमध्ये बसण्याचे सांगून वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या बाजूला एका जागी नेले व कारमध्येच त्याने तिच्यावर अत्याचार केल्याचा अत्यंत गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.

नोकरीचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार, औरंगाबादेत गजबजलेल्या भागातील धक्कादायक घटना

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद : नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून त्याने तिला रामगिरी हॉटेलजवळील स्टॉपवर बोलाविले. ती तेथे आली तेव्हा रात्रीचे नऊ वाजले होते. त्याने तिला कारमध्ये बसण्याचे सांगून वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या बाजूला एका जागी नेले व कारमध्येच त्याने तिच्यावर अत्याचार केल्याचा अत्यंत गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. अत्याचाराचा हा प्रकार १४ नोव्हेंबरच्या रात्रीचा; परंतु अत्याचार करणाऱ्या संशयिताने तिला धमकावले होते. त्यामुळे धीर बळावल्यानंतर तिने शनिवारी (ता.२६) पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महेबूब इब्राहिम शेख (रा. शिरूर कासार, जि. बीड) असे संशयिताचे नाव आहे. बायजीपुऱ्यातील २९ वर्षीय पीडितेचे बीए-डीएडपर्यंत शिक्षण झाले आहे. ती घरीच शिकवणी घेऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविते. शिकवणीसाठी ती नवीन जागेच्या शोधात होती. बीड बायपास परिसरात दोन महिन्यांपूर्वी भाड्याने खोली शोधत असताना मेहबूब इब्राहिम शेख याच्याशी तिची ओळख झाली. त्याने तिला शैक्षणिक माहिती विचारत शिकवणीपेक्षा मुंबईत नोकरी मिळवून देतो, असे आमिष त्याने दाखविले.

त्यानंतर तो दोन ते तीन वेळा तिला भेटला. १० नोव्हेंबरला त्यांची फ्लॅटवर भेट झाली. तेव्हा मुंबईला नोकरीच्या शोधात जायचे ठरले. १४ नोव्हेंबरला रात्री त्याने नऊला रामगिरी हॉटेलसमोर भेटायचे ठरले. त्यानुसार ती आली. त्यानंतर एका कारने महेबूब इब्राहिम शेख तेथे एकटाच आला. सुरुवातीला त्याने तिचा विश्‍वास संपादन करीत कारमध्ये बसवून गप्पा मारल्या. नंतर त्याने कार जालना रस्त्याजवळील वसंतराव नाईक महाविद्यालयासमोर अंधारात नेली. तेथे तरुणीवर अत्याचार केला.
 

अत्याचारानंतर धमकी
अत्याचाराच्या प्रकाराबाबत कोणाला काही सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली आणि कारमधून त्याने उतरवून दिल्याचे तरुणीने तक्रारीत नमूद केले आहे. घडलेल्या प्रकारानंतर भेदरलेली तरुणी घरीच होती. तिने हा प्रकार मावशीला सांगितल्यानंतर कुटुंबीयांनी सिडको पोलिस ठाण्यात अत्याचाराच्या आरोपाखाली गुन्ह्याची नोंद केली. गजबजलेल्या भागात अशी घटना घडल्यामुळे शहरातील सुरक्षेचे धिंडवडे निघाले.

Edited - Ganesh Pitekar

loading image