कारागृहातून बाहेर पडताच पुन्हा करायचा गांजा विक्री!  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime logo.jpg

गुन्हे शाखेने कारवाई करत आवळल्या मुसक्या 

कारागृहातून बाहेर पडताच पुन्हा करायचा गांजा विक्री! 

sakal_logo
By
सुषेन जाधव

औरंगाबाद : कारागृहातून बाहेर पडताच पुन्हा गांजाची विक्री करणाऱ्या गुन्हेगारांना पकडून गुन्हे शाखा पोलिसांनी दहा किलो ४८० ग्रॅम गांजा जप्त केला. ही कारवाई रोपळेकर चौकात बुधवारी मध्यरात्री करण्यात आली. जावेद खान अयूब खान (३५, रा. नूतन कॉलनी, ए. बी. सी. लॉन्ड्रीजवळ) आणि युसूफ खान उमर खान (४४, रा. समतानगर) अशी गांजा विक्रेत्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून चारचाकी वाहनदेखील जप्त करण्यात आले. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

जालन्याहून बीड-बायपासमार्गे रोपळेकर चौकात चारचाकी (एमएच-१५-बीडी-१८६४) वाहनातून गांजाची तस्करी केली जात असल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक अजबसिंग जारवाल यांना मिळाली होती. त्यावरून जारवाल यांनी पथकातील जमादार शिवाजी झिने, भाऊराव चव्हाण, गावडे, पोलिस नाईक राजेंद्र साळुंके, भोसले, गायकवाड, राऊत व चालक शिनगारे यांनी छापा मारून जावेद खान आणि युसूफ खान यांना पकडले. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

त्यांच्या चारचाकी वाहनातून एका पांढऱ्या रंगाच्या गोणीत असलेला दहा किलो ४८० ग्रॅम गांजा, दोन मोबाईल आणि वाहन असा ऐवज जप्त केला. याप्रकरणी उस्मानपुरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. काही दिवसांपूर्वी जावेद खान याला गांजाची तस्करी करताना अटक करण्यात आली होती. आता नुकतीच त्याची जामिनावर मुक्तता करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा त्याला गांजाची तस्करी करताना पकडण्यात आले. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(संपादन-प्रताप अवचार)

loading image
go to top