गावाकडे पायी निघालेल्या भुकेल्या बिऱ्हाडाला भोजन

photo
photo

औरंगाबाद : कोरोनामुळे हातावरचे पोट असणाऱ्यांचे हाल होत आहेत. हाताला काम नाही अशा स्थितीत रहायचे कसे या विवंचनेत नाशिक येथुन यवतमाळ जिल्ह्यातील आपल्या गावाकडे राठोड कुटूंबिय निघाले. वाहने तर नाहीतच असले तरी जवळ पैसा नाही म्हणुन लहाण मुला बाळांसह गावाकडे पायी निघालेले हे बिऱ्हाड उपाशीपोटी असल्याचे समजताच शिवसैनिकांनी येथे त्यांच्या जेवणाची सोय केली. त्यानंतर पुढच्या प्रवासातही कुठे अडचण आल्यास फोन करा असे सांगुन त्यांना दिलासा दिला.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

दहाजण चक्क पायी पायी गावाकडे

यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालूक्यातील साकरा गावचे राठोड कुटूंबिय नाशिक येथे बिगारी काम करून उदरनिर्वाह करायचे. ते तिथेच स्थायिक झालेले मात्र कोरोनाच्या साथीत झालेल्या लॉकडाऊनमुळे हाताला काम नाही. यामुळे दोन दिवसांपुर्वी ते नाशिकहून पायी पायी गावाकडे निघाले आहे. सहा पुरूष, दोन महिला आणि सोबत दोन लहाण मुले असे दहाजण चक्क पायी पायी गावाकडे निघालेले. वाटेने मिळेल ते खायचे आणि पुन्हा पायपीट असा प्रवास करत ते शनीवारी (ता.28) औरंगाबदमध्ये दाखल झाले. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

शिवसैनिक मदतीला धावले

रात्र झाल्याने बीड बायपासवरील कमलनयन बजाज रुग्णालयाच्या समोर रस्त्याच्या कडेला बसले होते. रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांना दिसले. त्यांची चौकशी केल्यानंतर सर्व प्रकार त्यांना समजला आणि त्यांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांना ही माहिती दिली. आमदार दानवे यांनी कार्यकर्त्यांना तिथेच थांबायला सांगुन शिवसैनिक राजेंद्र दानवे, बाळासाहेब दानवे व अन्य काहीजणांना एका वाहनात जेवण आणि पाण्याच्या बाटल्या पाठऊन दिल्या. या पदाधिकाऱ्यांनी त्यांना जेऊ घालून अस्थेवाईकपणे चौकशी केली, त्यांना धीर दिला. तसेच पुढच्या प्रवासातही कुठे अडचण आली तर आम्हाला फोन करा म्हणत त्यांना आपले मोबाईल नंबर दिले. पुढे अडचण आल्यास तिथेही मदत पोहचवली जाईल असे सांगुन त्यांन् धीर दिला.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com