esakal | Video : कोरोनानंतर भारत विकसित देश म्हणून सर्वात पुढे येणार...
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad - After Corona, India will be the most developed country.

सामाजिकशास्त्रांच्या नियमानुसार लोकांनी काय मागावे, यापेक्षा लोक गरजेनुसार काय मागतात, यावर अर्थव्यवस्था राजकीय इच्छाशक्तीद्वारे केंद्रित करावी लागते. 

Video : कोरोनानंतर भारत विकसित देश म्हणून सर्वात पुढे येणार...

sakal_logo
By
संदीप लांडगे

औरंगाबाद : कोरोनामुळे युरोप, अमेरिका येथील अर्थव्यवस्था आगामी काळात रसातळाला गेलेली असेल. यामुळे जगभरात अन्नटंचाई निर्माण होईल. अशा स्थितीत अन्नधान्य, फळे, भाजीपाला निर्यात करणारा भारत हा सगळ्यात मोठा देश म्हणून पुढे येईल. भारत हा कृषिप्रधान देश असल्याने कोरोनाच्या संकटावर मात करून काही वर्षांत वेगाने प्रगती करेल, असा अंदाज अर्थविषयक अभ्यासक व उद्योजक डॉ. डी. एस. काटे यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केला. 

रोजगाराला खरी प्राथमिकता 

डी. एस. काटे म्हणाले, की कोरोनाचे संकट किती दिवस राहील हे सांगणे कठीण आहे. लॉकडाउनमुळे जगभरात मंदी आहे. सामाजिकशास्त्रांच्या नियमानुसार लोकांनी काय मागावे, यापेक्षा लोक गरजेनुसार काय मागतात, यावर अर्थव्यवस्था राजकीय इच्छाशक्तीद्वारे केंद्रित करावी लागते. महामारीमुळे आर्थिक नुकसानाचे मोजमाप करण्यापेक्षा रोजगाराला खरी प्राथमिकता द्यावी लागणार आहे.

सोनिया गांधी म्हणाल्या, सर्व उद्योगांना विशेष पॅकेज द्या

या कालावधीत शहरीकरणामुळे निर्माण झालेल्या समस्यांचे दुष्परिणाम आपण अनुभवत आहोत. यावर उपाय म्हणून कृषी व ग्रामीण व्यवस्था उद्योगास चालना मिळणारे नियोजन व धोरण हवे आहे. यापुढे आवश्यकतेनुसारच वस्तूंचा वापर होत राहील. पारंपरिक पद्धतीने चालत आलेल्या औद्योगिक व सेवा उद्योग यांच्यावर परिणाम होईल. उपलब्ध साधन संपत्ती, नवीन मागणीनुसार त्रोटक उत्पादनाद्वारे हे परिवर्तन स्वीकारावे लागेल. यातून एका नवा भारत देश उदयाला येईल, असे मत त्यांनी व्यक्त केले. 

जागतिक व्यापारीकरणाचे परिणाम 

१९३० च्या महामंदीनंतर जगातील प्रत्येक देशाने औद्योगिकीकरणात योगदान देऊन जगभर व्यापारीकरण सुरू केले. त्यामुळे भौतिक सुविधा, तंत्रज्ञान, संशोधनाच्या अतिउच्च पातळीमुळे निसर्ग, मानवी मूल्ये घसरत गेली. विश्वाची अर्थसत्ता काबीज करण्यासाठी चढाओढ सुरू झाली. नागरिकांना आरोग्य व भौतिक सुविधा देण्याच्या ईर्षेतून प्राण्यांच्या जिवाणूचा प्रयोग दुसऱ्या प्राण्यावर करणे, त्यातून एखादी लस शोधणे किंवा मांस भक्षणासाठी क्लोनिंगद्वारे वेगळ्या प्राण्यांची निर्मिती करणे. 

HIVप्रमाणे कोरोनाचाही होतो का आरोग्यावर दूरगामी परिणाम - वाचा

अशा मिश्र आहारशैलीमुळे कोरोनासारखे विषाणू तयार झाले. या भीषण रोगराईमुळे संपूर्ण मानवजातीचे भविष्य अंधारमय झाले. या रोगाची लक्षणे, निदान, उपचार व दाहकता याबद्दल तज्ज्ञांमध्ये एकमत जाणवत नाही. अद्याप कोरोनावर उपचार करणारी कोणतीही लस उपलब्ध नाही, असेही त्यांनी नमूद केले. 

loading image