बँका समोर तोबा गर्दी, सोशल डिस्टन्सचा फज्जा 

बँका समोर तोबा गर्दी, सोशल डिस्टन्सचा फज्जा 


औरंगाबाद: भारत सरकारच्या गरीब कल्याण पॅकेज नुसार महिलांच्या जनधन बचत खात्यामध्ये प्रत्येकी पाचशे रुपये सानुग्रह अनुदान जमा करण्यात आले आहे. खात्यावरील पैसे काढण्यासाठी बँकांमध्ये मोठी गर्दी करण्यात येत आहे. मंगळवारी(ता.७) बँकांचा समोर यामुळे सोशल डिस्टन्सचा नियम कुणीच पाळत नसल्याची गंभीर स्थिती आहे. 

जनधन खात्यात केंद्र सरकारतर्फे पैसे जमा करण्यात आले आहेत. हे पैसे काढण्यासाठी प्रत्येक खातेदारांना वेगवेगळी तारखा देण्यात आले आहे. असे असतानांही महिलांतर्फे बँकांमध्ये गर्दी करण्यात येत आहे. लॉकडाऊन असल्यामुळे बँकांमध्ये गर्दी करु नयेत, एका वेळी केवळ पाच ग्राहकांनाच प्रवेश देण्याचं नियम आहे मात्र ग्राहक गर्दी करून हा नियम हे तोडत आहे.

रविवारी व सोमवारी बँकांना सुट्टी असल्यामुळे मंगळवारी (ता.७) बँक उघडण्या यापूर्वीच काही ग्राहक बँकेसमोर जाऊन बसले होते. व जनधन खात्यात पैसे जमा झालेत का याची बँकेकडे विचारणा करीत होते. 

अनेक खाती इनऑपरेटिव्ह 

जनधन खाते उघडल्यानंतर अनेकांनी त्यात व्यवहारच केला नाही यामुळे हे खाते निष्क्रिय (इनऑपरेटिव्ह) झाले आहेत. सरकारने दिलेले अनुदान काढण्यासाठी हे खाते सुरुवातीला १०० रुपये भरून ऍक्टिव्ह करावे लागले. ग्राहकाला हे अनुदान मिळाले. यास अनेकांचे खात्यांना आधार लिंक नव्हते हे आधार लिंक ही करण्यात आले आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com