CTET परीक्षा केंद्रात दागिन्यांवर बंदी, मंगळसूत्रही काढायला लावलं; छत्रपती संभाजीनगरमध्ये परीक्षार्थींची गैरसोय

CTET Exam 2026 : परीक्षा केंद्रात प्रवेश करायचा असेल तर दागिने काढून ठेवावे लागतील असं स्पष्ट सांगण्यात आलं. सुरक्षेच्या कारणास्तव लागू केलेल्या या नियमामुळे महिला परीक्षार्थींची मोठी अडचण झाली.
Women Candidates Asked to Remove Mangalsutra at CTET Centre

Women Candidates Asked to Remove Mangalsutra at CTET Centre

Esakal

Updated on

आज राज्यभरात सीटीईटी परीक्षा होत असून छत्रपती संभाजीनगरमध्ये महिलांना दागिने घालून प्रवेश नाकारण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. परीक्षा केंद्रात प्रवेश करायचा असेल तर दागिने काढून ठेवावे लागतील असं स्पष्ट सांगण्यात आलं. धातूचे कोणतेही साहित्य परीक्षा केंद्रात नेण्यास मनाई असल्याचं अजब कारण प्रशासनाकडून सांगण्यात आलंय. सुरक्षेच्या कारणास्तव लागू केलेल्या या नियमामुळे महिला परीक्षार्थींची मोठी अडचण झाली. दागिने काढून ठेवायचे कुठे? असा प्रश्न निर्माण झाला. यामुळे महिला परीक्षार्थींनी संताप व्यक्त केला.

Women Candidates Asked to Remove Mangalsutra at CTET Centre
8th Pay Commission: पगारात किती वाढ होणार? आठव्या वेतन आयोगाची वेबसाइट सुरू... कर्मचारी व पेन्शनधारकांना थेट सूचना देण्याची संधी
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com