डाळीच्या व्यवहारात दीड कोटीची फसवणूक; आंध्र, तमिळनाडू, कर्नाटकातील चौघांवर गुन्हा

रक्कम बिलासोबत देतो असे म्हणून कंपनीद्वारे मेलवरून कळवण्यात आले होते.
डाळीच्या व्यवहारात दीड कोटीची फसवणूक; आंध्र, तमिळनाडू, कर्नाटकातील चौघांवर गुन्हा

लातूर : येथील एमआयडीसीतील तीन डाळ मिलकडून डाळीची खरेदी करून दीड लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तमिळनाडू, आंध्रप्रदेश व कर्नाटकातील चौघांच्या विरोधात येथील एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. एमआयडीसीतील आदित्य इंडस्ट्रीज, आराध्या ॲग्रोटेक, कीर्ती उद्योग येथून चेन्नई येथील कुरींजी प्रो नॅचरल फुड प्रा. लि. या कंपनीद्वारे येथील गंगाधर जवाहरलाल धूत व एमआयडीसीतील इतर डाळ मिलकडून उडीद गोटा, हरभरा डाळ, तूरडाळ असा एकूण एक कोटी ५१ लाख २२ हजार ७१८ रुपयांचा माल जानेवारी २०२१ मध्ये खरेदी करण्यात आला होता.

डाळीच्या व्यवहारात दीड कोटीची फसवणूक; आंध्र, तमिळनाडू, कर्नाटकातील चौघांवर गुन्हा
पंकजा मुंडेंना कोरोनाची बाधा, सोशल मीडियावरून दिली माहिती

रक्कम बिलासोबत देतो असे म्हणून कंपनीद्वारे मेलवरून कळवण्यात आले होते. पण, हे बिल न देता फसवणूक केल्याप्रकरणी श्री. धूत यांच्या तक्रारीवरून सांडू व्यंकटरामअप्पा मोरीशेट्टी, खुरी नारायण व्यंकटरामअप्पा मोरीशेट्टी (रा. अनंतपूर, आंध्रप्रदेश), प्रदीपराज चंद्रबाबू (रा. कांचीपुरम, तामिळनाडू) व राजीव बी. एन. (रा. बंगळूर, कर्नाटक) यांच्या विरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com