संक्रांतीला करकोचा ठरला नायलॉन मांजाचा बळी

पतंग शौकीनांचा खेळ होतो मात्र पक्षांचा जीव जातोय
 Karkocha nylon manja victim
Karkocha nylon manja victimsakal
Updated on

औरंगाबाद : संक्रातीच्या (makar sankranti festival) दिवशी आकाशात रंगीबिरंगी पतंग झेपावताना दिसतात. पतंग शौकीनांचा खेळ होतो मात्र पक्षांचा जीव जातोय, वाहनधारक जखमी होत आहेत. ऐन संक्रांतीच्या दिवशी शुक्रवारी (ता.१४) बंदी असलेल्या नायलॉन मांजाने पांढऱ्या करकोचाचा बळी घेतला. प्राणीसंग्रहालयात या करकोचावर अंत्यसंस्कार करण्यात आले.(Karkocha became nylon manja victim)

 Karkocha nylon manja victim
ढगाळ वातावरणामुळे व्हायरल इन्फेक्शन

नायलॉन मांजामुळे शहरात नुकतेच गुलमंडी येथे दुचाकीवरून जाणाऱ्या एका महिलेच्या गळ्याला मांजाचा फास लागण्याने जखमी झाल्याची घटना घडली. त्यामुळे लाइफ केअर एनिमल्स वेल्फेअर असोसिएशन ऑफ औरंगाबाद आणि सलोखा ऍनिमल प्लॅनेट मल्टिसर्व्हिसेस या सेवाभावी संस्था नायलॉन मांजाविरोधी अभियान राबवित आहेत. माहापालिकेच्या मदतीने मांजा विरोधी अभियान सुरू करण्यात आले.

 Karkocha nylon manja victim
24 तासात 2 लाख 67 हजार रुग्णांची नोंद, मृत्यूही वाढले

जनजागृती करण्यात आली तरीही बंदी असतानाही पतंग उडवणाऱ्यांनी नायलॉन मांजाचा वापर केलाच. त्यामुळे करकोचाला हकनाक जीव गमवावा लागला. खाम नदीकाठी प्राणिसंग्रहालयानजीक नायलॉन मांजामुळे जखमी झालेल्या अवस्थेत एक करकोचा पक्षी आढळला. त्याच्यावर प्राणिसंग्रहालयातील दवाखान्यात उपचार करण्यात आले. मात्र त्या पक्षाचा डाव्या बाजूचा भाग नायलॉन मांजामुळे पूर्ण कापला गेला होता. खूप रक्तस्त्राव झाल्याने उपचाराअंती तो दगावला. मृत पक्षाचे पोस्टमार्टम व पंचनामा करून प्राणिसंग्रहालयाच्या मागील बाजूस खोल खड्डा करून पुरण्यात आले. यावेळी प्राणिसंग्रहालयातील कर्मचारी, लाइफ केअर अनीमल्स वेल्फेअर असोसिएशन व सलोखा प्रस्थापन संस्थेचे सदस्य हजर होते. पक्षाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या नायलॉन मांजा वापरणाऱ्या अज्ञात पतंगबाज विरुद्ध क्रांती चौक पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंदवण्यात आला. याप्रसंगी लाईफ केअर संस्थेचे सचिव जयेश शिंदे, अजय सातदिवे, सुनील लांडगे यांनी फिर्याद दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com