esakal | उद्यापासून तुळजापुरातून मराठा क्रांती ठोक मोर्चाचे 'तिसरे पर्व'  
sakal

बोलून बातमी शोधा

maratha kranti thok.jpg

रमेश केरे पाटील : मोर्चात राज्यभरातून सहभागी होणार समन्वयक 

उद्यापासून तुळजापुरातून मराठा क्रांती ठोक मोर्चाचे 'तिसरे पर्व'  

sakal_logo
By
प्रकाश बनकर

औरंगाबाद : मराठा समाजाच्या शैक्षणिक व नोकरीसाठी देण्यात आलेल्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली, याविरोधात मराठा संघटना चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. मराठा क्रांती ठोक मोर्चाचे तिसरे पर्व शुक्रवारी (ता.९) तुळजापूर येथून सुरू होणार आहे. मोर्चात राज्यभरातील समन्वयक सहभागी होणार असल्याची माहिती रमेश केरे पाटील यांनी (ता.८) पत्रकार परिषदेत दिली. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

श्री. केरे म्हणाले, की केंद्र सरकार व राज्य सरकारला जागे करण्यासाठी शुक्रवारी सकाळी ११ वाजता तुळजापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तुळजाभवानी माता मंदिर असा भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. यावेळी जागर गोंधळ घालत केंद्र व राज्य सरकारचा निषेध केला जाणार आहे. मोर्चात सहभागी होणारे सर्व नियमांचे पालन करतील. येत्या ११ तारखेला होऊ घातलेली एमपीएससी परिक्षा पुढे ढकलण्यात यावी, राज्य सरकारने मराठा हिताचे निर्णय घ्यावे अन्यथा परीक्षा सेंटर बंद पाडू असा इशाराही श्री. केरे यांनी दिला. पत्रकार परिषदेत भरत कदम, पंढरीनाथ गोडसे, किरण काळे, मनोज मुरदारे, शुभम केरे, तेजस पवार उपस्थित होते. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

गुणरत्न सदावर्ते यांनी संभाजीराजेंची माफी मागावी 
गुणरत्न सदावर्ते यांनी छत्रपती संभाजीराजे यांचा अपमान केला आहे. सदावर्ते यांनी तात्काळ संभाजी राजे व सकल मराठा समाजाची माफी मागावी नसता, मराठा क्रांती ठोक मोर्चाच्यावतीने सदावर्ते यांच्यावर बेताल वक्तव्य केल्याप्रकरणी राज्यभर गुन्हे दाखल करणार आहोत. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

राज्यमंत्री सत्तार यांचा राजीनामा घ्या 
राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना एका मराठा युवकाने मराठा आरक्षणाचा प्रश्न विचारला होता. सत्तार यांनी त्या मराठा युवकाला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली असून, त्या घटनेचा मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतिने निषेध करण्यात आला. लवकरच राज्यमंत्री सत्तार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अब्दुल सत्तार यांचा मंत्रीपदाचा राजीनामा घ्यावा नसता शिवसेनेच्या एकाही मंत्र्याला राज्यात फिरू देणार नाही, असा इशाराही केरे यांनी दिला आहे. 

(Edited By Prfatap Awachar)

loading image