esakal | मराठवाड्यात कोरोनाची ६३९ जणांना लागण, औरंगाबादेतील २५६ जणांचा समावेश
sakal

बोलून बातमी शोधा

Marathwada And Aurangabad Corona Updates

औरंगाबाद जिल्ह्यातील रग्णसंख्या ५० हजार ३६६ झाली असून २ हजार १०० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

मराठवाड्यात कोरोनाची ६३९ जणांना लागण, औरंगाबादेतील २५६ जणांचा समावेश

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद : मराठवाड्यात रविवारी (ता. २८) दिवसभरात ६३९ कोरोनाचे रुग्ण आढळले. त्यात औरंगाबादेत २५६, जालना ७९, उस्मानाबाद २०, बीड ४३, नांदेड ९०, परभणी ३३, हिंगोली ३२, लातूर जिल्ह्यातील ८६ रुग्णांचा समावेश आहे.  औरंगाबाद जिल्ह्यातील रग्णसंख्या ५० हजार ३६६ झाली असून २ हजार १०० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. बरे झालेल्या आणखी ७१ जणांना सुटी देण्यात आली. आजपर्यंत ४६ हजार ९९८ रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत १ हजार २६८ जणांचा मृत्यू झाला आहे.

वाचा - भयानक! दहा ते 12 रानडुकरांचा एकाच वेळी जीवघेणा हल्ला, रक्तबंबाळ झालेल्या शेतकऱ्याला वाचविण्यासाठी तरुण आले धावून

शहरातील बाधित (२०४)
परिसर, (कंसात रुग्णसंख्या) : घाटी परिसर (४), पोलिस कॉलनी पडेगाव (१), बालाजी कॉम्प्लेक्स गुलमंडी (१), न्यू उस्मानपुरा (१), दशमेश नगर (१), गारखेडा (७), कांचनवाडी (१), बन्सीलाल नगर (४), समाधान कॉलनी (१), राजा बाजार (१), बीड बायपास (७), धावणी मोहल्ला, शहागंज (३), रचनाकार कॉलनी (३), श्रेय नगर (३), अजब नगर (१), नागेश्वरवाडी (१), समर्थ नगर (१०), सिडको (१), मयूरबन कॉलनी, गादिया विहार रोड (१), झांबड इस्टेट (१), एन अकरा हडको (२), जाधववाडी (१), आदित्य नगर, टी पॉइंट (१), पिसादेवी (१), सारा परिवर्तन सावंगी (१), एन चार आनंद नगर (१), कासलीवाल पूर्वा चिकलठाणा (१), अयोध्या नगर (४), उत्तरानगरी (१), हनुमान नगर (२), एन दोन सिडको (४), रामनगर, एन दोन (१), एन चार सिडको (३), पायलट बाबा नगर, मुकुंदवाडी (२), प्रकाश नगर (४), ठाकरे नगर (१), एन तीन सिडको (१), मोरेश्वर हा. सो. गारखेडा (१), न्यायमूर्ती नगर शेंद्रा (१), संघर्ष नगर, मुकुंदवाडी शेंद्रा (१), मुकुंदवाडी (२), उल्कानगरी (३), देवळाई चौक (१), रोकडा हनुमान कॉलनी (१), शिवाजी नगर (६), बालाजी नगर (२), एन वन सिडको (२), गजानन नगर (२), त्रिमूर्ती चौक (२), भानुदास नगर (१), शहानूरमियाँ दर्गाह (१), एन नऊ सिडको (१), गुलमोहर कॉलनी (१), ईएसआय हॉस्पिटल परिसर (१), मयूर पार्क मारोती नगर (१), जय भारतमाता हा.सो (१), विश्रांती नगर (३), सहकार नगर (१), भवानी नगर (१), सातारा परिसर (५), छावणी परिसर (३), वाल्मी कार्यालयाजवळ, कांचनवाडी (१), शांतिनिकेतन कॉलनी (१), ब्लूबेल एमआयडीसी (१), मिलन नगर, एन पाच सिडको (१), साई नगर, एन सहा सिडको (४), औरंगपुरा (१), विशाल नगर (१), क्रांती चौक परिसर (१), ज्योती नगर (२), जालन नगर (२), टिळक नगर (१), एसबी कॉलनी (२), एनएच हॉस्टेल परिसर (१), एन सात सिडको (१), द्वारका नगर, हडको (१), वर्धमान रे.उल्कानगरी (१), पेठेनगर (१), दिशा संस्कृती इटखेडा (२), सूर्या लॉन्स देवळाई परिसर (२), देवगिरी कॉलेज जवळ, उस्मानपुरा (२), दर्गा रोड (१), न्यू शांतिनिकेतन कॉलनी, आकाशवाणी परिसर (१), नक्षत्रवाडी (१), दिशानगरी (१), कासलीवाल मार्बल (१), पेशवेनगर, सातारा परिसर (१), नाथ नगर (२), सह्याद्री हिल्स (१), गुरुसहानी नगर (१), एमजीएम कॉलेज परिसर (१), चैतन्य हा. सो (१), सिंधी कॉलनी (१), भानुदास नगर (२), विष्णू नगर (१), शास्त्री नगर (४), जवाहर कॉलनी (२), मल्हार चौक (१), अन्य (२४).

वाचा - पत्नी, दोन मुलांना मागे सोडून तरुण शेतकऱ्याने उचलले शेवटचे पाऊल; वडिलांच्या शेतातच!

ग्रामीण भागातील बाधित (५२) : बाबरा फुलंब्री (१), बजाज नगर, वडगाव (२), शेंद्रा (१), टाकळीवाडी गंगापूर (१), दिशाकुंज सो., वडगाव (१), लोकमान्य चौक, बजाज नगर (१), तीसगाव (१), म्हाडा कॉलनी, बजाज नगर (२), स्नेहवाटिका, ए. एस. क्लबजवळ (३), वडगाव को. (४), जय भवानी नगर, बजाज नगर (१), वाळूज एमआयडीसी परिसर (१), लासूर स्टेशन (१), गंगापूर (१), सारा इलाइट, सिडको महानगर (१), सिडको महानगर (४), अन्य (२६).

वाचा - Success Story: अडचणींवर मात करत अखेर बनला PSI, राहुलने पहिल्याच प्रयत्नात मिळविले यश


उपचारादरम्यान सहा मृत्यू
उपचारादरम्यान औरंगाबाद-जालन्यात प्रत्येकी दोन, बीड-परभणीत प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला. तीसगावातील ६६ वर्षीय पुरुष, संभाजी कॉलनीतील ३२ पुरुषाचा घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
------
कोरोना मीटर (औरंगाबाद)
---
आतापर्यंतचे बाधित- ५०३६६
बरे झालेले- ४६९९८
उपचार घेणारे- २१००
आतापर्यंत मृत्यू- १२६८

Edited - Ganesh Pitekar