धक्कादायक! तो म्हणाला, खरं प्रेम सिद्ध कर, तिने मुलींसमोर केले असे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Married Womansuicide At Bhagatsingh Nagar Aurangabad

रविवारी रात्री दोघांत वाद झाला. त्यावेळी आकाशने "माझ्यावर प्रेम असेल तर सिद्ध कर' असे मायाला सांगितले. पतीच्या त्रासाला वैतागलेल्या मायाने गळफास घेण्याचा निर्णय घेतला.

धक्कादायक! तो म्हणाला, खरं प्रेम सिद्ध कर, तिने मुलींसमोर केले असे

औरंगाबाद - "तू खरंच माझ्यावर प्रेम करीत असशील तर आत्महत्या कर' असे पतीने म्हटल्यानंतर पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना सोमवारी (ता. सहा) सकाळी भगतसिंगनगर भागात उघडकीस आली. या प्रकरणावरून घाटी रुग्णालयात माहेर व सासरच्या कुटुंबीयांत वाद व मारहाण झाली. 

हर्सूल पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, माया आकाश सुरडकर (वय 22, रा. भगतसिंगनगर) असे मृताचे नाव आहे. बुलडाणा जिल्ह्यातील मायाचा पाच वर्षांपूर्वी आकाश सुरडकर याच्याशी विवाह झाला होता. त्यांना एक साडेतीन वर्षांची व दुसरी चार महिन्यांची मुलगी आहे. आकाश एका वित्त कंपनीत वसुलीचे काम करतो. रविवारी रात्री दोघांत वाद झाला. त्यावेळी आकाशने "माझ्यावर प्रेम असेल तर सिद्ध कर' असे मायाला सांगितले. पतीच्या त्रासाला वैतागलेल्या मायाने गळफास घेण्याचा निर्णय घेतला.

दोघेही सोबतच गळफास घेऊ, असा निर्णय झाला. पहाटे दोनच्या सुमारास खुर्ची ठेवून सीलिंग फॅनला दोन साड्या बांधण्यात आल्या. त्यानंतर मायाने गळ्यात फास घेतला. त्यानंतर आकाशने पायाखालची खुर्ची ओढली. गळफास बसताच मायाची तडफड सुरू झाली. या प्रकाराने आकाश घाबरला व त्याने मायाचे पाय धरून तिला वाचविण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याचा उपयोग झाला नाही.

दरम्यान, त्यांच्या छोट्या मुलीला जाग आली. तिच्या रडण्याने आकाशची आई जागी झाली व त्यांनी दारावर थाप मारली. आकाशने दरवाजा उघडला त्यावेळी माया गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली. या घटनेची माहिती आकाशच्या मेहुण्याला देण्यात आली. त्यांनी हर्सूल पोलिस ठाण्यात घटनेची माहिती दिली. त्यानंतर उपनिरीक्षक पांडुरंग भागिले व इतर कर्मचारी घटनास्थळी आले. याप्रकरणी हर्सूल पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. 
 
तान्हुलीला दूध कोण पाजणार? 
माया आणि आकाशला दोन मुली आहेत. त्यापैकी एक साडेतीन वर्षांची, तर दुसरी अवघी चार महिन्यांची आहे. मायाच्या आत्महत्येमुळे या दोन्ही मुलींचे आईचे छत्र हरपले असून, आता चार महिन्यांच्या तान्हुलीला दूध कोण पाजणार, असा हृदयद्रावक प्रश्‍न चिमुकलीकडे पाहून उपस्थित झाला. 

गुंता कायम -  जिल्हा परिषद हातात आली, मात्र आता विरोधात कोण?
 
अंत्यसंस्कारावेळीही सुरक्षा 
घटनेची माहिती मायाच्या माहेरच्यांना समजताच त्यांनी घाटी रुग्णालयात धाव घेतली. तिथे माहेर व सासरच्या लोकांत वाद व मारहाण झाली. या घटनेनंतर दंगा नियंत्रण पथकालाही तेथे पाचारण करण्यात आले. त्यानंतर अंत्यसंस्कारावेळीही हर्सूल पोलिसांनी अनुचित प्रकार टाळण्यासाठी सुरक्षा पुरविली होती, अशी माहिती उपनिरीक्षक पांडुरंग भागिले यांनी दिली. 

धक्कादायक -  तीन प्रकारचे इंजेक्‍शन घेत गोल्ड मेडलिस्ट तरुण डॉक्‍टरची आत्महत्या

हेही वाचा - शाळा बुडवणाऱ्या मुलांच्या मदतीने लागला या बहुचर्चित खुनाचा छडा
 

Web Title: Married Woman Suicide Bhagatsingh Nagar Aurangabad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top