esakal | दूधाच्या किंमतीत एवढी झाली दरवाढ :वाचा
sakal

बोलून बातमी शोधा

Milk prices rise by two rupees

दूधाच्या किंमतीत एवढी झाली दरवाढ :वाचा

sakal_logo
By
प्रकाश बनकर

औरंगाबाद : जिल्हा दूध उत्पादक संघाने दूध विक्रीसाठी प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला. ही नवीन दर रविवारपासून (ता. 16) लागू होणार असल्याची माहिती संघाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी दिली. 

जिल्ह्यातील मुख्य दूध पुरवठादार असलेल्या जिल्हा सहकारी दूध संघातर्फे देवगिरी महानंद या ब्रॅण्डच्या माध्यमातून आपली उत्पादने बाजारात आणली आहेत. रोज सरासरी 75 हजार लिटरपेक्षा जास्त दुधाचे संकलन केले जाते. स्थानिक पातळीवर सरासरी 50 हजार लिटरहून अधिक दुधाची विक्री होते. यासह ताक, लस्सी आदी दुग्धजन्य पदार्थाची निर्मिती व विक्री संघामार्फत केली जाते. जिल्ह्यातील सुमारे 60 हजारांहून अधिक दूध उत्पादक शेतकरी संघाला नियमित दूध पुरवठा करतात.

हेही वाचा  राज ठाकरे अडकले, आणि मग...  

दूधबॅंग 46 रुपये प्रतिलिटरने विक्री

दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून प्रतिलिटर एक रुपया अधिक भावाने आता दूध संघ खरेदी करीत आहे. ही वाढ 11 फेब्रुवारीपासून शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. शेतकऱ्यांकडून 30 रुपये प्रतिलिटरने खरेदी केली जात होती. आता ती 31 रुपयांची प्रमाणे होत आहेत; तसेच पॅकिंगद्वारे विक्री होणाऱ्या दुधावर लिटरमागे रुपयांची वाढ करण्यात आली आहे. आता पूर्वी पॅकिंगद्वारे 44 रुपये लिटरने विक्री होणारी दूधबॅंग आता 46 रुपये प्रतिलिटरने विक्री होणार आहे. 16 फेब्रुवारीपासून ही दरवाढ होणार आहे. 

हेही वाचा:सेनेच्या बालेकिल्ल्यात राज ठाकरे यांनी काय केले  

दीड महिन्यात तिसऱ्यांदा दरवाढ 
एक जानेवारीला संघाने खरेदी दरात लिटरमागे एक रुपयांची वाढ केली होती. 21 जानेवारीला दूध संघाच्या झालेल्या बैठकीतनंतर पुन्हा दूध खरेदीत एक रुपयांची दरवाढ करण्यात आली हेती. संघाचा दूध खरेदीदर प्रतिलिटर 29 रुपये होता. दरवाढीनंतर आता उत्पादक शेतकऱ्यांना लिटरमागे 30 रुपये करण्यात आला. आता तो 31 रुपयांवर गेला आहे. आता पुन्हा तिसऱ्यांदा एक रुपया खरेदीसाठी तर दोन रुपये विक्रीसाठी वाढ करण्यात आली आहेत. 

हेही वाचा- सयाजी शिंदे म्हणाले, मी वड बोलतोय... माझा जन्म १८५७ चा 

loading image