esakal | एमटीडीसीच्या दिशादर्शक फलकावर इंग्रजीच्या चुका, पर्यटनमंत्र्यांना ट्विट  
sakal

बोलून बातमी शोधा

000MTDC.jpg

नेहमीच चर्चेत राहणारा राज्याचा पर्यटन विभाग आता इंग्रजी भाषेमुळे चर्चेत आला आहे. दौलताबाद रस्‍त्यावरील मिटमिटा गावात औरंगजेब कबर आणि बनी बेगम बागचा मार्ग दर्शविणाऱ्या फलकावर इंग्रजीच्या चुका आहेत.

एमटीडीसीच्या दिशादर्शक फलकावर इंग्रजीच्या चुका, पर्यटनमंत्र्यांना ट्विट  

sakal_logo
By
प्रकाश बनकर

औरंगाबाद : नेहमीच चर्चेत राहणारा राज्याचा पर्यटन विभाग आता इंग्रजी भाषेमुळे चर्चेत आला आहे. दौलताबाद रस्‍त्यावरील मिटमिटा गावात औरंगजेब कबर आणि बनी बेगम बागचा मार्ग दर्शविणाऱ्या फलकावर इंग्रजीच्या चुका आहेत.

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या पर्यटकांपर्यंत चुकीचा संदेश जात आहे. यामुळे हे दुरुस्त करण्याची मागणी आझाद युवा बिगेड यांच्यातर्फे सोमवारी (ता.१९) पर्यटनव संस्कृतिक कार्य विभागाचे सचिव वल्सा नायर यांच्याकडे निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

 औरंगजेब कबर Aurangzeb grave ऐवजी Aurangzeb kabar, बनी बेगम बाग Bani Begam Park ऐवजी Bani Begam Bag अशी चुकीची इंग्रजी आहे. या विषयी टुरिझम फोरमचे अध्यक्ष जसवंतसिंग राजपुत यांनी या विषयी पर्यटनमंत्री अदित्य ठाकरे, पर्यटन मंत्रालय आणि जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना ट्विट करून हि माहिती दिली आहे. तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी आझाद बिगेडचे अध्यक्ष मोबीन अन्सारी, उपाध्यक्ष वसीम सिद्दीकी, सचिव अब्दूल रहिम खान,हाजी असद मिर्झा, अल्तमश हाश्‍मी, उमैर सिद्दीकीस, शेख परवेज यांनी केली. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(Edited By Pratap Awachar)

loading image
go to top