

₹70 Lakh Land Fraud Exposed: Raju Jadhav Finally Behind Bars
Sakal
करमाड (जि. छत्रपती संभाजीनगर): बनावट इसारपावती आणि तोतयागिरीच्या माध्यमातून ७० लाख रुपयांची फसवणूक करून गेल्या दोन वर्षांपासून फरार असलेल्या कुख्यात ब्रोकरला अटक करण्यात आर्थिक गुन्हे शाखेला यश आले आहे. राजू ऊर्फ कचरू विठ्ठल जाधव (रा. पाल, ता. फुलंब्री; सध्या रा. हर्सूल) असे त्याचे नाव आहे. शुक्रवारी (ता. ३०) हर्सूल टी-पॉइंट परिसरात सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.