
शिवसेनेचे छत्रपती संभाजीनगरमधील खासदार संदीपान भुमरे यांच्या ड्रायव्हरला हैदराबादमधील कुटुंबानं दीडशे कोटींची जमीन भेट दिल्याची माहिती समोर आलीय. या प्रकरणी एका वकिलानं तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं तपास सुरू केला आहे. जालना रोडवर दाऊदपुरा भागात ३ एकर जमीन भुमरे यांच्या चालकाला देण्यात आलीय. यावरून आता खासदार भुमरे यांच्यावरही आरोप होत आहेत.