esakal | बॉयलर पेटून महिना उलटला, मुक्तेश्वर साखर कारखाना बंदच, शेतकरी संभ्रमात!  
sakal

बोलून बातमी शोधा

बॉयलर.jpg

कारखान्याचे ज्येष्ठ संचालक रामचंद्र नेरळ यांच्या संकल्पनेतून हा कारखाना उभारला असून आपल्या भागातील ऊसउत्पादकांचा फायदा व्हावा. या दृष्टीकोनातून धामोरी येथील शेतकऱ्यांनी अल्प दरात कारखान्यासाठी जमिनी दिल्या. परिसराला वरदान ठरणारा कारखाना उभारला. यावर्षी गोदावरी पट्ट्या शेंदूरवादा भागात पावसाचे प्रमाण चांगले असल्याने मोठ्या प्रमाणात ऊस लागवड आहे.

बॉयलर पेटून महिना उलटला, मुक्तेश्वर साखर कारखाना बंदच, शेतकरी संभ्रमात!  

sakal_logo
By
नानासाहेब जंजाळे

शेंदूरवादा (औरंगाबाद) : धामोरी बुद्रुक (ता. गंगापूर) येथील मुक्तेश्वर साखर कारखान्याचे बॉयलर पेटून जवळपास महिना उलटला. मात्र, अद्यापपर्यत तरी कारखाना सुरू झाला नसल्याने कारखान्याची चाके रुतलेली पहावयास मिळत आहे. शेंदुरवादा परिसरातील शेतकरी संभ्रमात असून बाहेरील गंगामाई बारामती अॅग्रो, संभाजीराजे सह इतर साखर कारखान्याच्या टोळ्या शेंदुरवादा घोडेगाव मांगेगाव सावखेडा भागात येऊन ऊसतोड करीत आहे. त्यामुळे आपला ऊस नेमका कोणत्या कारखान्याला द्यावा या द्विधा मनस्थितीत ऊसउत्पादक शेतकरी असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

कारखान्याचे ज्येष्ठ संचालक रामचंद्र नेरळ यांच्या संकल्पनेतून हा कारखाना उभारला असून आपल्या भागातील ऊसउत्पादकांचा फायदा व्हावा. या दृष्टीकोनातून धामोरी येथील शेतकऱ्यांनी अल्प दरात कारखान्यासाठी जमिनी दिल्या. परिसराला वरदान ठरणारा कारखाना उभारला. यावर्षी गोदावरी पट्ट्या शेंदूरवादा भागात पावसाचे प्रमाण चांगले असल्याने मोठ्या प्रमाणात ऊस लागवड आहे. त्यानुसार अनेकांनी लगतच्याच कारखान्यात ऊस द्यायचे ठरविले. त्यानुसार महिन्याभरापुर्वी कारखान्याचे बॉयलर पेटले. त्यानंतर दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर संत महंतच्या हस्ते मोळी टाकण्याचा कार्यक्रमही व्यवस्थापनाने उरकून घेतला. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

आता आपल्या भागातील कारखाना सुरू झाल्याने आपला ऊस याठिकाणी नक्कीच जाईल. या आशेने असंख्य ऊसउत्पादकांनी ठरवले होते. मात्र अद्यापही कारखाना सुरू नसल्याने अनेकांचे स्वप्न हवेत विरले आहे. त्यामुळे शेतकऱ्यात संतापाचे वातावरण आहे. दुसरीकडे या भागात इतर कारखान्यांनी टोळ्या टाकून जोरात ऊसतोडी सुरू केल्या आहेत. नेहमी स्पर्धेत राहणार हा कारखाना या वर्षी मात्र मागे पडल्याने परिसरातील शेतकऱ्याकडून बोलले जात आहे. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मुक्तेश्वर साखर कारखाना येथील मील फिटरला खोकला त्रास जाणवू लागल्याने त्यांची तपासणी केली असता त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर पुन्हा काहींची तपासणी केली असता तीन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. आता एकूण चार जण पॉझिटिव्ह असून त्यांना कोरोना सेंटरमध्ये त्यांच्यावर पुढील उपचार सुरू आहे.


मुक्तेश्वर साखर कारखाना चालू करण्याचे काम युद्धपातळीवर असून यावर्षीचा पावसाळा लांबल्याने रस्ता अभावी  शेतकऱ्यांचा ऊस सध्या कारखान्याला ऊस पुरवठा करण्यात अडचणी येत असून लवकरात लवकर नियोजन करून कारखाना सुरू करण्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहे. -रामचंद्र निरपळ (ज्येष्ठ संचालक मुक्तेश्वर साखर कारखाना) 

(संपादन-प्रताप अवचार)