हूक-हातोड्याने बायकोवर १०० वार, मृतदेहावर बाळाला ठेवून तो फरार

Aurangabad news
Aurangabad news

औरंगाबाद : अत्यंत निर्घृण पद्धतीने पत्नीचा खून करून पती फरार झाल्याची घटना शहरात घडली आहे. बांधकामावरील वॉचमनने हातोडा आणि सेंट्रिंगच्या कामात वापरल्या जाणाऱ्या लोखंडी हूकने पत्नीवर १०० वार केले. हा निर्घृण खून करून, तिच्या मृतदेहावर बाळाला तसेच सोडून पती फरार झाला आहे. 

खुनाच्या घटनेतही इतके क्रौर्य़ पाहून साक्षात मृत्यूही लाजला असेल. पतीने पत्नीचे हातपाय बांधून, तिच्यावर लोखंडी हूक आणि हातोड्याने शंभर वार करून तिचा खून केला. सातारा परिसरातील अरुणोदय कॉलनीत ही घटना घडली आहे. जयश्री राम काळे (वय २६) असे मृत महिलेचे नाव असून, राम बाबुराव काळे या पतीने तिला ठार मारल्याची घटना घडली आहे. 

फक्त खून करूनच नराधन थांबला नाही, तर त्याने पत्नीच्या नग्नावस्थेत बांधलेल्या मृतदेहाजवळ लहानग्या बाळाला तसेच सोडून तो फरार झाला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, पोलीस फरार पतीचा शोध घेत आहेत. या प्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

घटनास्थळावरून पोलिसांनी पंचनामा करून जयश्रीचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. मृतदेहाजवळ सापडलेल्या बाळाची पोलीस काळजी घेत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फूटेजही तपासण्यात येणार असल्याचे पोलिस सूत्रांनी म्हटले आहे.

काय आहे प्रकरण... 

पतीच्या मारहाणीला कंटाळून जयश्री दोन मुलांसह जालना जिल्हा सोडून औरंगाबादेत आली होती. ती एका बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी वॉचमन म्हणून कामाला होती. सहा दिवसांपूर्वीच तिचा पती राम हादेखील तेथे आला होता.

शनिवारी सकाळी ठेकेदार त्या ठिकाणी आला असता, पत्र्याच्या झोपडीत जयश्री नग्नावस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. तर तिचा लहान अडीच वर्षीय मुलगा तिच्या मृतदेहाच्या शेजारी झोपलेला होता. 

पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, जयश्रीचे दोन्ही हात पाय कापडाने बांधलेले होते, तर तिच्या डोक्यावर, हातावर आणि पायावर हतोड्याने व सेंटरिंग कामात वापरल्या जाणाऱ्या टोकदार हुकने वार करण्यात आले होते. 

सहा वर्षांच्या मोठ्या मुलाला घेऊन राम ठिकाणावरून पळून गेला आहे. चिकलठाणा पोलीस फरार आरोपी पतीचा पोलीस शोध घेत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com