गुणवत्ता सुधारण्यासाठी घाटीने पार केले राज्याचे लक्ष

obgy
obgy

औरंगाबाद : राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतून घाटी रुग्णालयाच्या स्त्रीरोग व आरोग्य विभागाने लेबररूम क्वालिटी इम्प्रुव्हमेंट इनिशेएटिव्हमध्ये (लक्ष कार्यक्रम) राज्य शासनाची चाचणी पार करीत केंद्राच्या चाचणीसाठी पात्र होणारे राज्यातील पहिले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ठरण्याचा मान मिळवला. मार्चपर्यंत केंद्राची एमसीआयच्या धर्तीवर पाहणी होऊन घाटीत लक्ष्य कार्यक्रमाला सुरवात होण्याची शक्‍यता असल्याचे स्त्रीरोग विभागप्रमुख डॉ. श्रीनिवास गडप्पा म्हणाले.

घाटी रुग्णालयातील प्रसूतिगृहाचे नूतनीकरण करण्यात आले. त्यासाठी लायन्स क्‍लब ऑफ औरंगाबाद, राष्ट्रीय आरोग्य अभियान, स्त्रीरोग विभागाच्या फंडातून विविध सुधारणा करत नूतनीकरण करण्यात आले. त्याचे उद्‌घाटन शनिवारी पार पडले. यावेळी लायन्सचे नितीन बंग, अनिता दंडगव्हाळ, रश्‍मी अग्रवाल, महावीर पाटणी, प्रभारी अधिष्ठाता डॉ. कैलास झिने, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश हरबडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी डॉ. सोनाली देशपांडे, डॉ. विजय कल्याणकर, डॉ. प्रशांत भिंगारे, इंदुमती थोरात, शुभमंगल भक्त, इन्चार्ज किरण डोंगरदिवे, सुनीता चक्रनारायण, कुंदा पानसरे, द्रोपदी कर्डिले, कालिंदी इधाटे आदींसह परिचारिका व कर्मचाऱ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी डॉ. अमोल जोशी, शेख शहाबानो, बी. जी. नायर, रेश्‍मा अहिरे, दुर्गा मुटकुळे, स्वप्नाली निधाने, प्रवीण वाकेकर, अमोल अहिरे आदींसह निवासी डॉक्‍टरांची उपस्थिती होती. 

हेही वाचा - या शिक्षिकेच्या सल्ल्याने अजय देवगणने केले तान्हाजीत बदल

मान्यवर म्हणाले... 
डॉ. गडप्पा म्हणाले, भार असतानाही चांगली सेवा देणे सर्वाच्या सहकार्यामुळे शक्‍य झाले. डॉ. कैलास झिने यांनी प्रंचड भार आणि तुटवड्यात अविरत सेवा देताना स्त्रीरोग विभागात गुणवत्तेची कास धरत असल्याचे संस्थेसाठी अभिमानास्पद असल्याचे सांगितले. लक्ष कार्यक्रमाला प्रभावीपणे राबवण्यासाठी गुणवत्तेचे विविध मानके सांभाळणे खूप आव्हानात्मक असले तरी त्यासाठी विभाग सज्ज असल्याचे मत डॉ. सोनाली देशपांडे यांनी व्यक्त केले. शुभा घोणशीकर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. सोनाली देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. 

उघडून तर पाहा - या ठिकाणी अजूनही सुरक्षित आहे तान्हाजींची तलवार अन् माळ, पाहा PHOTOS

प्रसूती कक्ष झाला अत्याधुनिक 
लायन्स क्‍लॅब ऑफ औरंगाबादचा एन्जल ग्रुपच्या वतीने दहा बेड आणि आयव्ही स्टॅंड, एनएसटी यंत्र, बेबी वॉर्मर, दोन व्हीलचेअर, स्ट्रेचर ट्रॉली, वॉटरबेड दिला. अशी साधारण तीन लाख रुपयांची मदत प्रसूतिकक्षाच्या नूतनीकरणात केली. एनएचएमकडून मिळालेल्या निधीतून ग्रॅनाईट व चार एसी बसवण्यात आल्या. याशिवाय स्त्रीरोग विभागांच्या वरिष्ठ तज्ज्ञांनी डिपार्टमेंट फंडातून साधारण दीड लाख किमतीचे दोन बर्थिंग बेड या प्रसूतिगृहात उपलब्ध करून दिले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com