esakal | शस्त्र बाळगणाऱ्या व्यापाऱ्याला अटक, शाळेत चोरी
sakal

बोलून बातमी शोधा

1crime_33

तलवार, चाकू घेऊन फिरणाऱ्या संशयित व्यापाऱ्याला एमआयडीसी सिडको पोलिसांनी ताब्यात घेतले.

शस्त्र बाळगणाऱ्या व्यापाऱ्याला अटक, शाळेत चोरी

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद : तलवार, चाकू घेऊन फिरणाऱ्या संशयित व्यापाऱ्याला एमआयडीसी सिडको पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई २५ डिसेंबरला करण्यात आली. गौरव अरुण चव्हाण (४० रा. साऊथ सिटी, वाळूज) असे संशयिताचे नाव आहे. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास प्रोझान मॉल ते सिडको, एन-१ रस्त्यावर पोलिसांची नाकाबंदी सुरु असताना व्यापारी चव्हाण याच्या कारची पोलिसांनी तपासणी केली. तेव्हा त्यात कारमध्ये तलवार व एक चाकू अशी शस्त्रे आढळून आली. त्यावरुन त्याच्याविरुध्द एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

शाळेत चोरी, सीसीटीही पळवला
बीड बायपास येथील नारायणा ई टेन्को शाळेत २१ डिसेंबरला चोरी झाली. शाळेतून चोराने अ‍ॅम्पलीफायर, मायक्रोफोमसह सीसी टीव्ही लंपास केला. शाळेच्या कंपाऊंडचे तार कापून तीन चोरांनी शाळेत शिरुन हे चोरीचे काम केले. तिन्ही चोर डिव्हीआरमध्ये कैद झाले असून, शाळेचे कर्मचारी इमरान खान मसूद खान (३९, रा. मोतीवालानगर) यांच्या तक्रारीनुसार, सातारा पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

दुचाकी लंपास
राहुल कोठारी (वय ३५, रा.खाराकुआँ) यांची दूचाकी कुशलनगर येथील घरासमोरुन चोरी झाली. ते कामानिमित्त बहिणीकडे गेले होते. त्यावेळी त्यांनी घरासमोर दुचाकी लावली होती. चोराने संधी साधून त्यांची दुचाकी हँडल लॉक तोडून लांबवली. या प्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली.

संपादन - गणेश पिटेकर

loading image
go to top