esakal | पैठण तिहेरी हत्याकांड तपासादरम्यान एक पिस्टल, ४ काडतूसे जप्त 
sakal

बोलून बातमी शोधा

crime_1020.jpg

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई 

पैठण तिहेरी हत्याकांड तपासादरम्यान एक पिस्टल, ४ काडतूसे जप्त 

sakal_logo
By
सुषेन जाधव

औरंगाबाद : पोलिस अधिक्षक कार्यालयातील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून पैठण तालूक्यातील जुने कावसान येथील तिहेरी हत्याकांडाचा तपास सुरू असताना, एका सराईत गुन्हेगाराला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या जवळून एक पिस्तूल व चार जिवंत काडतूस असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पकडलेल्या आरोपीचे नाव किशोर शिवदास पवार (रा. वडीगोद्री, ता. अंबड) असे आहे. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पैठण येथील कावसान गावात शनिवारी (ता.२८) एका कुटूंबातील तीन सदस्यांची निघृण हत्या झाल्याचे प्रकरण समोर आले होते. याप्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडून केला जात होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक भागवत फुंदे, पोलिस अंमलदार श्रीमंत भालेराव, धीरज जाधव, संजय काळे, प्रमोद खांडेभराड, शेख नदीम व चालक उमेश बकले या पथकाला एका सराईत गुन्हेगाराबाबत माहिती मिळाली होती.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

या माहितीवरून गुन्हे शाखेच्या पथकाने पाचोड बस स्थानकाच्या समोरील रोडवर सापळा रचून, एका दुचाकीवरून येत असलेल्या सराईत गुन्हेगाराला ताब्यात घेतले. किशोर पवार असे सराईत गुन्हे गाराचे नाव आहे. त्याच्या जवळून एक पिस्तूल आणि चार जिवंत काडतूस आणि चार मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी संबंधीत पोलिस ठाण्यात सराईत गुन्हेगाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(संपादन-प्रताप अवचार)

loading image