
मोसबीनंतर आता डाळींब पिकावर नैसर्गिक संकट ओढावले आहे. परिस्थिती हाताबाहेर गेल्यामुळे पैठण तालुक्यातील मुरुमा या गावातील शेतकर्याने मोठ्या मेहनतीने उभारलेल्या अडीच एकरातील डाळींबाच्या बागेवर जेसीबी फिरवला. हे करताना त्यांच्या डोळ्यात अश्रु अनावर झाले होते.
अन् त्यांनी अडीच एकरातल्या डाळींबावर जेसीबी फिरवला, पैठण तालुक्यातील शेतकऱ्याची ह्र्दयद्रावक कहाणी.
पाचोड (औरंगाबाद) : मोसंबीनंतर घराला घरपण व चारचौघांत मोठेपण देणाऱ्या डाळींबावर पडलेल्या जीवाणूजन्य करपा (तेल्या) रोगामुळे डाळींब उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक गणित विस्कटले गेले. फळे परिपक्व होऊन विक्रीच्या बेतात असतानाच संततधार पाऊस व "तेल्या" रोगाने बागेला ग्रासले. खर्च निघण्याची शाश्वती न राहिल्याने मुरमा (ता. पैठण) येथील शेतकऱ्याने डाळिंबांची सहाशे झाडे जेसीबीच्या सहाय्याने उपटून टाकली.
मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
पैठण तालुक्यात मोसंबीचे साडेआठ हजार तर डाळींबाचे साडेतीन हजार हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आहे. मोसंबी, डाळींब व ऊस ही तालुक्यातील महत्वाची व नगदी पैसा देणारे पिक म्हणून ओळखले जातात. यंदा मोसंबीला कोरोनाच्या पार्श्वभूमी भूमीवर लॉक डाऊनचा फटका बसल्याने भाव कोसळले त्यामुळे मोसंबी उत्पादक पुर्णत: कोमेजला गेला. तर ऐन डाळिंबाच्या बागा फळ उतरविण्याच्या वेळीच परिसरात संततधार पाऊस होऊन त्यावर करपा व तेल्या रोगाचा प्रार्दूभाव झाला. डाळींबाचे दर कमालीचे कोसळले. व्यापाऱ्यांनी बागा खरेदीकडे कानाडोळा केला. बागेच्या जोपासनेवर झालेला खर्चही निघत नसल्याने अनेक शेतकऱ्यानी झाडांवरील फळे तोडून बांधावर टाकली. डाळींब उत्पादकाचे आर्थिक गणित विस्कटले गेले.
औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
डाळीबावर आलेल्या संकटामुळे खचून मुरमा (ता.पैठण) येथील शेतकरी महेश ज्ञानेश्वर लेंभे यानी आठ वर्षीपूर्वी लागवड केलेली एक हेक्टर क्षेत्रातील सहाशे झाडे तोडून टाकण्याचा निर्णय घेतला. या वर्षी बागेवर झालेल्या दीड लाख रुपये खर्चाची पर्वा न करता डाळींबाची बाग जिवंत ठेवली. मात्र बागेतील ७० ते ८० टक्के डाळिंब तेल्या रोगांमुळे खराब झाले. यंदा या बागेतून त्यांना चांगले उत्पादन मिळण्याचे स्वप्न धूसर बनले. सर्व बागेवर तेल्याचा प्रार्दुभाव झाल्याने फळे डागाळलेले गेले.
देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
कॅरेट भरभरून डाळींब फेकून द्यावे लागले. तर काही कॅरेट बाजारात विक्रीस नेले असता त्यास कवडीमोलही भाव मिळाला नाही. त्यामूळे महेश लेंभे यांनी डाळिंबाची बाग तोडण्याचा निर्णय घेतला. संपूर्ण डाळीबाच्या बागेवर जेसीबी फिरवून संपूर्ण झाडे उपटून फेकली. यावेळी बाग तोडताना या शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळल्याचे दिसून आले. शासनाने डाळींब उत्पादकांचा शंभर टक्के फळपीकविमा मंजुर करुन दिलासा दयावा अशी मागणी महेश लेंभे यांनी केली.
(संपादन-प्रताप अवचार)
Web Title: Paithan Taluka Farmer Heartbreaking Story Jcb Turned Two And Half
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..