esakal | पैठणखेड्यातील दुर्देवी घटना : नदीच्या प्रवाहात वाहून गेलेल्या दोघांपैकी एकाचा शोध लागला 
sakal

बोलून बातमी शोधा

paithan kheda.jpg

पैठणखेडा (ता. पैठण) येथील दोन तरुण नदीच्या प्रवाहात वाहून गेले. ही घटना बुधवारी (ता.२९) पाच ते साडेपाच वाजेच्या सुमारास घडली आहे. वाहून गेलेल्या दोघांपैकी एकाचा आज ता.३० रोजी दुपारी  शोध लागला आहे. तर दुसर्‍याचा शोध सुरु आहे.  

पैठणखेड्यातील दुर्देवी घटना : नदीच्या प्रवाहात वाहून गेलेल्या दोघांपैकी एकाचा शोध लागला 

sakal_logo
By
परमेश्वर कोकाटे

चितेगाव (औरंगाबाद) : पैठणखेडा (ता. पैठण) येथील दोन तरुण नदीच्या प्रवाहात वाहून गेले. ही घटना बुधवारी (ता.२९) पाच ते साडेपाच वाजेच्या सुमारास घडली आहे. वाहून गेलेल्या दोघांपैकी एकाचा आज ता.३० रोजी दुपारी  शोध लागला आहे. तर दुसर्‍याचा शोध सुरु आहे.  

प्यार वाली लव्ह स्टोरी : उस्मानाबादचा 'पठ्ठया' प्रियसीसाठी चक्क पाकिस्तान बॉर्डरवर..! 
एक महिन्याच्या विश्रांती नंतर परिसरात बुधवारी (ता. २९) दुपारी दोन वाजेच्या सुमारास सुरु झालेल्या जोरदार पाऊस मुळे परिसरातील नदीनाल्याला पुर आला. या पुरात पैठणखेडा येथील पुजांराम कैलास नवले (वय २३), अशोक परसराम हुले (वय २४) हे दोन तरुण नदीच्या प्रवाहात वाहून गेले. 

Breaking: काँग्रेसचे जेष्ठ नेते डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर कोरोना पॉझिटिव्ह, प्रकृती उत्तम 

घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार पैठणखेडा येथील गावाजवळ दोन नदीचा संगम आहे. या दोन नदीच्या संगमावर नळकांडी पुल बांधलेला आहे. या पुलाच्या नळ्यात मोठ्याप्रमाणात कचरा आडकल्यामुळे काही पाणी पुलाच्या वरुन वाहात होते. पुलाच्या पलीकडे अशोक हुले यांच्या दोन बहिणी शेतातुन उभ्या होत्या.

कोरोना बाधित रुग्णांना काजू अन् अक्रोडचा खुराक   

त्या घेण्यासाठी अशोक नदीच्या पलीकडे जाण्यासाठी निघाला. पुलाच्या मध्यंतरी गेला असता पाय घसरून खाली पडला. त्यास वाचवण्यासाठी पुजाराम नवले गेला, तो ही वाहून गेला. ही दोन्ही मुले आईवडीलांना एकुलती एक होती. पुजाराम नवले यांचे दोन महिण्यापुर्वीच लग्न झाले होते.

ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...   

सदरील घटनेची माहिती बिडकीन पोलीसांना पोलीस पाटील जयश्री भुजंग यांनी दिली. पोलीस उपनिरीक्षक सुधाकर चव्हाण, दिलीप सांळवे सह कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. राञी उशीरा पर्यंत शोधकार्य सुरु होते. 

पुंजारामचा देह मिळाला 
रात्री पासून सुरु झालेल्या शोधकार्याला अखेर आज ता.३० यश मिळाले. दोघांपैकी पुजांराम नवले या तरुणाचा शोध लागला. त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बीडकीन आरोग्य केंद्रांत नेण्यात आला. तर दुसर्या युवकाचा शोध सुरु होता. 

बेडूक अन् उंदरांवर चालते त्यांची उपजीविका  

सकाळी आठ वाजल्यापासून शोध कार्य सुरु आहे. सकाळी साडेसात वाजता गावातील तरुणांनी शोध घेवून   पुजाराम कैलास नवले यांचा मृत्तदेह बाहेर काढला. महानगरपालिकेच्या अग्नीशमन दलाचे जवान दुस-या तरुणाचा शोध घेत आहे. या नदावरील बंधारा बाजूने फोडून बंधा-यातील पाणी काढण्याचे काम सुरु आहे घटनास्थळी तहसीलदार चंद्रकांत शेळके, मंडळ आधिकारी संभाजी थोटे उपस्थित आहेत. अद्यापही एका तरुणांचा शोध लागला नाही.

Edited By Pratap Awachar

loading image