Aurangabad News | सिडको- हडकोचा पाणी प्रश्न पेटला, भाजपने केले आंदोलन

उन्हाळा सुरू होताच औरंगाबादेतील पाण्याचा प्रश्न पुन्हा पेटला आहे.
Agitation For Water In Aurangabad
Agitation For Water In Aurangabad esakal

औरंगाबाद : उन्हाळा सुरू होताच शहरातील पाण्याचा प्रश्न पुन्हा पेटला आहे. सिडको- हडको भागाला तब्बल आठ दिवसानंतर पाणी मिळत असल्याने नागरिक संतप्त आहेत. त्यामुळे भाजपने औरंगाबादच्या (Aurangabad) सिडको एन-५ येथील पाण्याच्या टाकीसमोर सोमवारी (ता. चार ) आंदोलन केले. यावेळी सत्ताधारी शिवसेना (Shiv Sena), काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जोपर्यंत आयुक्त निवेदन स्विकारणार नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. शहराचा पाणीप्रश्न गेल्या काही दिवसांपासून गंभीर बनला आहे. शहरात दररोजच्या पाण्याची गरज २०५ एमएलडी असून, आजघडीला केवळ ११० एमएलडी पाणी मिळते. (People Agitation For Water In Aurangabad)

Agitation For Water In Aurangabad
ED मुळे फायरब्रँड राज ठाकरे हे 'फ्लाॅवर' का झाले? : रूपाली ठोंबरे

जुन्या दोन्ही पाणीपुरवठा योजना जीर्ण झाल्या आहेत. पाइपलाइन फुटणे, तांत्रिक बिघाड नित्याची झाली आहे. त्यामुळे शहरात काही भागात पाच दिवसाला तर काही भागात आठ दिवसाला पाणी मिळत आहे. उन्हाळ्यात पाण्याची मागणी वाढली आहे. त्यात नळाला अत्यल्प पाणी मिळत असल्याने नागरिक संतप्त आहेत. त्यामुळे भाजपने (BJP) सर्वपक्षीय आंदोलनाचे आवाहन केले होते. मात्र फक्त भाजपचे कार्यकर्ते सकाळी ९.३० वाजता. सिडको एन-५ येथील पाण्याच्या टाकीसमोर जमा झाले.

Agitation For Water In Aurangabad
भारत बायोटेकला झटका, जागतिक आरोग्य संघटनेने कोव्हॅक्सिनचा पुरवठा रोखला

'पाणी आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे, सिडको- हडकोला पाणी मिळालेच पाहिजे, यासह सरकार, प्रशासनाच्या विरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनात आमदार अतुल सावे, माजी नगरसेवक शिवाजी दांडगे, महेश माळवदकर, राज वानखेडे, मनिषा मुंडे, बालाजी मुंडे, नितिन चित्ते यांच्यासह भाजप कार्यकर्ते सहभागी झाले होते. दरम्यान पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता किरण धांडे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. मात्र आंदोलन करणाऱ्यांचे समाधान झाले नाही.

Agitation For Water In Aurangabad
मुलाप्रमाणे जपलेला १७ एकरावरील ऊस जळून खाक, शेतकऱ्याला अश्रू अनावर

प्रशासकाच्या बंगल्यावर आंदोलनाचा इशारा

सकाळी साडेनऊ वाजल्यापासून आंदोलन सुरू होते. मात्र महापालिकेचा एकही अधिकारी आंदोलनाकडे फिरकला नाही. त्यामुळे आमदार अतुल सावे यांनी संताप व्यक्त केला. अधिकारी आले नाही तर प्रशासकाच्या बंगल्यावर जाऊन आंदोलन करू, असा इशारा सावे यांनी यावेळी दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com