esakal | पोलिसाने अत्याचार केला, भावी पतीला अश्लिल व्हिडिओ पाठवून तिचे मोडले लग्न
sakal

बोलून बातमी शोधा

Rape

लग्नाचे आमिष दाखवत शारिरीक संबंध प्रस्थापित करुन पिडितेचे लग्न मोडण्यासाठी पिडितेच्या भावी पतीला शारिरीक संबंधाचे व्हिडीओ पाठविणारा आरोपी तथा मुकुंदवाडी पोलिस ठाण्यातील शिपायाला सायबर पोलिसांनी सोमवारी (ता.२४) रात्री अटक केली. रविंद्र कडुबा दाभाडे (३६, रा. सिध्दार्थनगर, टिव्ही सेंटर, हडको) असे त्या आरोपीचे नाव आहे

पोलिसाने अत्याचार केला, भावी पतीला अश्लिल व्हिडिओ पाठवून तिचे मोडले लग्न

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद: लग्नाचे आमिष दाखवत शारिरीक संबंध प्रस्थापित करुन पिडितेचे लग्न मोडण्यासाठी पिडितेच्या भावी पतीला शारिरीक संबंधाचे व्हिडीओ पाठविणारा आरोपी तथा मुकुंदवाडी पोलिस ठाण्यातील शिपायाला सायबर पोलिसांनी सोमवारी (ता.२४) रात्री अटक केली. रविंद्र कडुबा दाभाडे (३६, रा. सिध्दार्थनगर, टिव्ही सेंटर, हडको) असे त्या आरोपीचे नाव आहे. 

क्लिक कराः स्वतःच्या विहीरीतील पाणी दिले, आता मोबादल्यासाठी शेतकऱ्यांची होतेय पायपीट  

हडको भागातील एका २४ वर्षीय तरुणीने तक्रार दिली होती. तक्रारीनुसार, पोलिस शिपाई रविंद्र दाभाडे याने लग्नाचे अमिष दाखवत तिच्या इच्छेविरुध्द शारिरीक संबंध प्रस्थापित केले. तरुणीने दाभाडेला लग्नासाठी तगादा लावला, तेंव्हा दाभाडे हा विवाहीत असून त्याला एक मुलगा असल्याचे तरुणीला समजले.

त्यामुळे तरुणीने दाभाडेशी नाते तोडले. मात्र आरोपीने तरुणीच्या नकळत शरिरीक संबंधांचे व्हिडिओ तयार केल्याचे सांगत माझ्याशी संबंध ठेवावेच लागतील अन्यथा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. व विविध ठिकाणी नेत तिच्यावर अत्याचार केले. तसेच आरोपीने तिच्या भावी पतीला शारिरीक संबंधाचे व्हिडिओ पाठविले. त्यामुळे तरुणीचे लग्न मोडले.

हेही वाचाः हमालानेच लांबविले अडीच लाखांचे दागिने, नविन घरी सामान शिफ्ट करताना मारला डल्ला  

प्रकरणात सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्यात अटक होउ नये यासाठी आरोपी रविंद्र दाभाडे याने अटकपूर्व जामीनीसाठी अर्ज सादर केला असता न्यायालयाने तो फेटाळला. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. आरोपीला मंगळवारी (ता.२६) न्यायालयात हजर करण्यात आले असता आरोपीने गुन्ह्यात वापरलेले उपकरण जप्त करणे आहे.

आरोपीच्या ताब्यातून पिडितेचा अश्लिल व्हिडीओ जप्त करणे आहे. सदरील व्हीडीओ आरोपीने कोठे जतन करुन ठेवला का याचा देखील तपास बाकी आहे. आरोपीने गुन्ह्यात वापरलेले कपडे जप्त करणे आहे. तसेच आरोपीला गुन्ह्यात कोणी मदत केली का याचा देखील तपास बाकी असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील आमेर काजी यांनी न्यायालयाकडे केली. विनंती मान्य करुन न्यायालयाने वरील प्रमाणे आदेश दिले. 

हे वाचलंत का?- मी जप केल्यामुळे कोरोनाकाळात भारतात अमेरिकेसारखी स्थिती नाही, खैरेंचा अजब दावा 

संपादनः सुषेन जाधव

loading image
go to top