esakal | अरेरे...सरपंच, पुढाकाऱ्याने बलात्कार करण्यासाठी केली मदत...आता दिलासा नाहीच....
sakal

बोलून बातमी शोधा

Court

अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन अत्याचार केल्याच्या गुन्ह्यात मदत करणाऱ्या सरपंचासह गावातील एका पुढाऱ्याने दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज विशेष न्यायाधीश आर. एस. निंबाळकर यांनी फेटाळला. गंगाधर उत्तम सदाशिवे (४१) असे सरंपचाचे तर मनोहर ओंकार जगताप (५६, दोघे रा. ता. सोयगाव) असे पुढाऱ्याचे नाव आहे.

अरेरे...सरपंच, पुढाकाऱ्याने बलात्कार करण्यासाठी केली मदत...आता दिलासा नाहीच....

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद : अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन अत्याचार केल्याच्या गुन्ह्यात मदत करणाऱ्या सरपंचासह गावातील एका पुढाऱ्याने दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज विशेष न्यायाधीश आर. एस. निंबाळकर यांनी फेटाळला. गंगाधर उत्तम सदाशिवे (४१) असे सरंपचाचे तर मनोहर ओंकार जगताप (५६, दोघे रा. ता. सोयगाव) असे पुढाऱ्याचे नाव आहे.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

प्रकरणात १७ वर्षीय पिडितेच्या वडीलांनी तक्रार दिली होती. तक्रारीनुसार, १ एप्रिल रोजी आरोपी अल्पवयीन मुलाने पिडितेला पळवून नेले होते. प्रकरणात फर्दापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास सुरु असतांना ३ एप्रिल रोजी पिडिता पोलिस ठाण्यात हजर झाली. पोलिसांनी पिडितेचा जबाब घेतला.

जबाबानुसार, १ एप्रिल रोजी रात्री पिडितेला आरोपी अल्पवयीन मुलाने फोन केला, व माझे तुझ्यावर प्रेम आहे, तु माझ्या सोबत पळुन आली नाही तर तुला व तुझ्या भावाला मारुन टाकीन अशी धमकी दिली. त्यामुळे घाबरुन पिडिता आरोपी सोबत घरातून पळाली. तेंव्हा अल्पवयीन मुलाचा भाऊ, मामा भारत साळवे, मामी सिमा साळवे, कलाबाई साळवे, रमेश साळवे यांनी पिडितेला बळजबरी गावाजवळील जंगलातील एका झोपडीजवळ नेले. त्यानंतर आरोपी व पिडितेला तेथे सोडून ते सर्व निघून गेले. आरोपीने पिडितेवर दोन दिवस अत्याचार केला.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठीक्लिक करा

३ एप्रिल रोजी सकाळी साडेदहा वाजता आरोपीचा मामा भारत याने पिडितेला घेऊन पिंपळी घाटाच्या रस्त्यावर बोलावले. त्यानुसार आरोपी पिडितेला घेउन गेला. तेंव्हा तेथे एका पांढऱ्या रंगाच्या जीपसह मनोहर जगताप, सरपंच गंगाधर सदाशिवे, संजू चव्हाण, भारत सावळे, सिमा साळवे उभे होते. त्यांनी तु पोलिस ठाण्यात गेल्यावर आरोपीला मी स्वत: पळवून आणल्याचे सांग अन्यथा तुझ्यासह आई-वडीलांना व भवाला जीवे मारु अशी धमकी दिली. त्यानंतर पिडितेला जीप मध्ये बसवून पोलिस ठाण्यात आणल्याचे जबाबात नमुद करण्यात आले आहे. प्रकरणात आरोपींविरोधात फर्दापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान गुन्ह्यात अटक होऊ नये यासाठी आरोपी सरपंच गंगाधर सदाशिवे व मनोहर जगताप यांनी अटकपूर्व जामीनीसाठी अर्ज सादर केला. सुनावणीवेळी सहाय्यक लोकाभियोक्ता अरविंद बागुल यांनी गुन्हा गंभीर आहे. तसेच आरोपी हे राजकीय पुढारी असल्याने त्यांना जामीन दिल्यास ते राजकीय वजन वापरुन पिडितेसह साक्षीदारांवर दबाव आणु शकतात. पुरावे नष्ट करु शकतात त्यामुळे आरोपींना जामीन देण्यात येवु नये अशी विनंती न्यायालयाकडे केली. विनंती मान्य करुन न्यायालयाने आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला.
महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा