औरंगाबाद जिल्ह्यात दोन हजार १५९ शाळांमध्ये प्रत्यक्ष अध्यापन सुरु, विद्यार्थ्यांची ५० टक्के उपस्थिती

Schools Reopen In Aurangabad News
Schools Reopen In Aurangabad News

औरंगाबाद : शासनाच्या आदेशानुसार पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग टप्प्याटप्प्याने सुरु करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील पाचवी ते दहावीचे शाळा महाविद्यालयांमध्ये प्रत्यक्ष अध्यापनाला सुरुवात झाली आहे. शाळा सुरु झाल्यानंतर पंधरा दिवसांतच विद्यार्थ्यांची उपस्थिती ५० टक्क्यांवर पोहोचली आहे. शासनाने कोरोना सूचनांचे पालन करुन वर्ग सुरु करण्याची परवानगी दिली आहे. या शिवाय विद्यार्थ्यांची दैनंदिन उपस्थिती, शिक्षकांच्या कोरोना तपासण्या आदी माहिती ऑनलाईन करण्याच्या सूचना आहेत.

काही ठिकाणी पालकांमध्ये अद्यापही कोरोनाची भिती दिसत आहे. मात्र, अनेक शाळांनी कोरोना संसर्गासाठी प्रभावी उपाययोजना करुन शाळा सुरु केल्या आहेत. अद्यापही अनेक शाळांमध्ये ऑनलाईन अध्यापनच सुरु आहे. जिल्ह्यात २३ नोव्हेंबरला तर शहरात चार जानेवारीपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरु झाल्यानंतर शासनाच्या आदेशानुसार शिक्षकांसह कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली.

यात जिल्ह्यातील पाचवी ते पाठवीपर्यंतच्या ७ हजार ८०६ पैकी ७ हजार २७५ शिक्षकांची कोरोना चाचणी झाली. यामध्ये सहा शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळले. पॉझिटिव्ह आलेल्या शिक्षकांवर रुग्णालयात उपचार सुरु असून शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची नियमित थर्मामीटर, ऑक्सिमीटरद्वारे तपासणी करण्यात येत आहे. यासोबतच शिक्षणाधिकारीही प्रत्यक्ष शाळेला भेटी देत आहे. 


उपस्थित विद्यार्थ्यांचे प्रमाण ५० टक्क्यांवर
जिल्ह्यात पाचवी ते आठवीच्या एकूण २ हजार १६८ शाळा आहेत. त्यात एकूण २ लाख २० हजार ७८४ इतकी विद्यार्थी संख्या आहे. त्यापैकी २१५९ शाळा प्रत्यक्षात सुरु झाल्या आहेत. त्यामध्ये प्रत्यक्ष एक लाख २ हजार ४६० विद्यार्थी उपस्थित राहात आहे. म्हणजे एकूण ४६.४१ टक्के विद्यार्थी उपस्थित राहात आहेत. तरी देखील जिल्ह्यातील ९ शाळा अद्याप बंद आहेत. 

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com