आम्ही पक्षप्रमुखांच्या पाठीशी

शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिला विश्‍वास.
Shiv Sena office bearers from Aurangabad district meet Shiv Sena chief Uddhav Thackeray mumbai
Shiv Sena office bearers from Aurangabad district meet Shiv Sena chief Uddhav Thackeray mumbai

औरंगाबाद - आम्ही तुमच्या सोबत आहोत. औरंगाबाद शहर आणि जिल्ह्याची शिवसेना मजबूत आहे, असा विश्वास प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला. यावर त्यांनी आपणा सर्वांना मिळून शिवसेना पुन्हा मजबुतीने उभी करायची आहे, असे आवाहन केले.

औरंगाबाद जिल्ह्यातील शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सोमवारी (ता. ११ ) मुंबईत ‘मातोश्री’ निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. पदाधिकारी व ठाकरे यांच्यात सुमारे एक तास बैठक झाली. या बद्दलची माहिती देताना शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी सांगितले की, औरंगाबादची शिवसेना अभेद्य आहे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत, हे सांगण्यासाठी आम्ही सर्वजण मुंबईला गेलो होतो. यावेळी शिवसेनेचे नेते सुभाष देसाई, विनायक राऊत, औरंगाबादचे संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, जिल्हाप्रमुख तथा आमदार अंबादास दानवे, उदयसिंग राजपूत, मनिषा कायंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

‘मातोश्री’ निवासस्थानी सुमारे तासभर बैठक झाली. फुटीर पाच आमदारांच्या मागे औरंगाबाद जिल्ह्यातील कुणीही नाही. पदाधिकारी, नगरसेवक तर तुमचेच आहेत पण नागरिक देखील तुमच्यासोबतच आहेत, अशी ग्वाही पक्षप्रमुखांना दिल्याचे श्री. खैरे म्हणाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही यावेळी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. धनुष्यबाण आपलाच आहे, तो कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. आपल्याला मुकाबला करायचा आहे आणि शिवसेना पुन्हा मजबूतीने उभी करायची आहे, असे आवाहन ठाकरे यांनी केल्याचे श्री. खैरे यांनी सांगितले.

यावेळी माजी महापौर नंदकुमार घोडेले, रेणुकादास (राजू) वैद्य, जयवंत ओक, शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी, बाळासाहेब थोरात, विजय वाघचौरे, विनायक पांडे, अविनाश गलांडे, मनाजी मिसाळ, प्रकाश चव्हाण, राजू ठोंबरे यांच्यासह सर्व तालुक्यांचे तालुकाप्रमुख, उप तालुकाप्रमुख, महिला आघाडीच्या पदाधिकारी आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com