

Heartbreaking Beed Tragedy: Mother and Child Found Dead in Well!
बीड : पतीने मोबाइल घेऊन दिला नाही म्हणून संतापलेल्या महिलेने आपल्या साडेतीन वर्षांच्या चिमुरड्याला सोबत घेऊन विहिरीत उडी घेतली. यात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना लिंबारूई (ता. बीड) शिवारात घडली. नुकत्याच घडलेल्या या प्रकरणावर पतीच्या पुरवणी जबाबानंतर बीड ग्रामीण पोलिसांत शनिवारी (ता. ३१) गुन्हा दाखल झाला.