औरंगाबाद : तब्बल ५० कंत्राटी चालक एसटीच्या कर्तव्यावर हजर

संपकरी कर्मचाऱ्यांनी केला सुरवातीला विरोध
ST 50 contract drivers are on duty
ST 50 contract drivers are on dutysakal

औरंगाबाद : संपकरी कर्मचारी कर्तव्यावर परत येत नसल्याने एसटी (ST)महामंडळाने पर्यायी मार्ग शोधला असून सोमवारी (ता.१७) मध्यवर्ती बसस्थानकात ५० कत्रांटी चालकांना(50 contract drivers) नियुक्त करण्यात आले आहे. दरम्यान कंत्राटी चालकाच्या मदतीने प्रशासनाने सोमवारी १५ एसटी बसेसमध्ये प्रवाशी घेऊन जात असतांना संपकरी (Strike)कर्मचाऱ्यांनी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करीत एसटीच्या या निर्णयाचा निषेध केला. या कर्मचाऱ्यांना ४८ दिवसांचे प्रशिक्षण न देताच त्यांच्या हातात स्टेअरिंग देऊन प्रवाशांच्या जीवाशी खेळ केला जात असल्याचा आरोप संपकरी कर्मचाऱ्यांनी केला आहे.

ST 50 contract drivers are on duty
औरंगाबादेत थरार ! जुन्या वादातून तरुणाचा नऊ जणांनी केला खून

मागील दोन महिन्यापासून एसटीचे चालक-वाहक संपावर गेले आहे. जो पर्यत विलिनीकरण होत नाही तो पर्यत माघार घेणार नाही अशी भूमिका संपकरी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे आता शासनानेच चालक पुरविण्याची जबाबदारी मुंबई येथील अस्तीत्व मल्टीपर्पज सर्व्हिस या एजन्सीला सोपविली आहे. या एजन्सीने सोमवारी औरंगाबादेतील मध्यवर्ती बसस्थानकाला ५० चालक दिले. या चालकांमार्फत विविध मार्गावर लालपरीची सेवा सुरू करण्यात आली आहे. दरम्यान संपकरी कर्मचाऱ्यांनी खाजगी एजन्सीमार्फत नियुक्त करण्यात आलेल्या चालकाचा विरोध करीत बसस्थानक परिसरात घोषणाबाजी करत विरोध दर्शवला. या घटनेनंतर पोलिस आणि एसटी प्रशासनाने मध्यस्थी करत खासगी कंत्राटी चालकांच्या ताब्यातील लालपरी विविध मार्गावर रवाना केल्या. सोमवारी दुपारी १५ कंत्राटी चालक हे आपल्या कर्तव्यावर हजर झाले. हजर झालेले चालक हे लालपरीत प्रवासी घेऊन सिल्लोड, कन्नड,पैठण आणि नगरकडे रवाना झाले.

आणखी दोन कर्मचारी बडतर्फ

औरंगाबाद विभागात संपकरी कर्मचार्यांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. सोमवारी दि.१७ दोन कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. आता पर्यत बडतर्फ करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची संख्याही ६९ वर जाऊन पोहचली आहे.

ST 50 contract drivers are on duty
शाळा, महाविद्यालय बंद निर्णयाचा फेरविचार करावा; आ.सतीश चव्हाण

संपकरी कर्मचाऱ्यांची तक्रार

सोमवारी दुपारी कर्तव्यावर जाणाऱ्या खाजगी कंत्राटी चालकांच्या प्रशिक्षणावरून संपकरी एसटी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांत शाब्दिक वाद झाला. नियमानुसार ४८ दिवसांच्या प्रशिक्षणानंतर चालकाला कर्तव्यावर पाठविले पाहिजे. मात्र, खासगी चालकांना एक दिवसाच्या प्रशिक्षणानंतर थेट कर्तव्य कसे पाठविले जात आहे, अशी विचारणा संपकरी कर्मचाऱ्यांनी केली. ते एवढ्यावरच थांबले नाही तर याची लेखी तक्रार जिल्हाधिकारी, परिवहन कार्यालय तसेच पोलिस आयुक्तांकडे करण्यात आली. सदरच्या तक्रारीत म्हटले आहे की एसटी महामंडळ विना प्रशिक्षण चालकांच्या हाती एसटीचे स्टेअरिंग देत आहे. हे प्रवाशांच्या जिवाशी खेळ करीत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.(Aurangabad News)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com