esakal | ग्राहकाला दुकानासमोर उभं करुन आतल्या खोलीत गळफास 
sakal

बोलून बातमी शोधा

अनील क्षिरसागर

लघूशंकेला जाऊन येतो असे ग्राहकाला सांगून अनील आतल्या खोलीत गेले. त्यावेळी त्यांचे आई वडील झोपेतच होते. आई-वडील झोपेत असतानाच अनील यांनी दहा मिनिटांतच जगाचा निरोप घेतला.

ग्राहकाला दुकानासमोर उभं करुन आतल्या खोलीत गळफास 

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद : "दहा मिनिटं दुकानाकडे लक्ष दे मी आलोच'' असं म्हणून किराणा दुकान चालवणारा तरुण आतल्या खोलीत गेला. अन..आत गळफास घेऊन आत्महत्या केली.

ही गंभीर घटना बुधवारी (ता. 22) पहाटे साडेसहाच्या सुमारास मुकुंदवाडीतील संघर्षनगर येथे घडली. पोलिसांकडून प्राप्त माहितीनूसार, अनील वामनराव क्षीरसागर (वय 29, रा. संषर्घनगर, मुकुंदवाडी) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.

अविवाहित असलेल्या अनीलचे संघर्षनगर येथे घर व ओमसाई किराणा नावाने दुकान आहे. हे दुकान तो स्वत:च चालवित होता. बुधवारी पहाटे उठल्यानंतर त्याने दुकान उघडले, झाडझूड व साफसफाई केली. पहाटेच एक ग्राहक किराणा घेण्यासाठी आला.

तेव्हा अनील क्षिरसागर यांनी ""दहा मिनिटं थांब दुकानकडं लक्ष दे मी आतून आलोच'' असे सांगितले. यानंतर ते आत गेले. बराच वेळ होऊनही ते आतून बाहेर न आल्याने ग्राहकाने त्यांना आवाज दिला. पण प्रतिसाद न आल्याने ग्राहकाने आई-वडीलांना आवाज दिला.

वडील दुकानकडे आले तेव्हा अनील नसल्याने त्यांनी त्याचा शोध घेतला. एका खोलीचा दरवाजा आतून बंद असल्याने त्यांनाही प्रश्‍न पडला. त्यांनी दरवाजा तोडल्यानंतर अनील क्षीरसागर यांनी खोलीतील छताला गळफास घेतल्याची बाब दिसून आली.

यानंतर नातेवाईकांनी आरडाआरेड केल्यानंतर नागरिक गोळा झाले. पोलिसांना बोलावत अनील यांना घाटी रुग्णालयात दाखल केले. परंतु डॉक्‍टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हेडकॉन्स्टेबल विष्णू जगदाळे करीत आहेत. 

दूध देऊन येतो असे सांगून गेले

लघूशंकेला जाऊन येतो असे ग्राहकाला सांगून अनील आतल्या खोलीत गेले. त्यावेळी त्यांचे आई वडील झोपेतच होते. आई-वडील झोपेत असतानाच अनील यांनी दहा मिनिटांतच जगाचा निरोप घेतला. आत्महत्या करण्यासारखे कोणतेही कारण नसताना त्यांनी आत्महत्या का केली हे कळत ही असे नातेवाईकांकडून सांगण्यात आल्याचे तपास अधिकारी जगदाळे यांनी सांगितले.

हेही वाचा -

 एका क्‍लिकवर वाचा औरंगाबादची गुन्हेगारी     

 नाशिकच्या मुलीसोबतही झाला होता तो प्रकार!

याच्यावर आहे चाळीसपेक्षा अधिक गुन्हे औरंगाबादेतून चोरले होते सत्तर तोळे सोने 

चौघींच्या दादल्याने टाकले एकीच्या खात्यात 14 लाख अन..मग असं झालं