शिक्षक म्हणतात, परीक्षा ऑफलाइनच व्हाव्यात

राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत विद्यार्थी टिकणे गरजेचे
Offline Exam Updates
Offline Exam Updatessakal

औरंगाबाद : बारावीची परीक्षा ऑनलाइन घेण्याचा आग्रह धरीत विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. मात्र, ज्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वर्षभरापासून कधी ऑनलाइन; तर कधी ऑफलाइन पद्धतीने अध्यापनाचे कार्य केले, यासंदर्भात जिल्ह्यातील प्राध्यापक, शिक्षकांनी ‘सकाळ’कडे आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. (Offline Exam Updates)

याबाबत जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. रवींद्र पाटील म्हणाले, परीक्षेपूर्वी सर्व विद्यार्थ्यांचे लसीकरण होणे आवश्यक आहे. त्याकरिता परीक्षा दोन-तीन आठवडे पुढे ढकलली गेली तरी चालते. ऑफलाइन परीक्षा घेऊन लागलेले निकाल विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी गुणवत्ता सिद्ध करणारा आहे. राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत महाराष्ट्रातील विद्यार्थी टिकला पाहिजे, यासाठी परीक्षा घेणे आवश्यक आहे. तर परीक्षा ऑफलाइन झालेल्याच योग्य होईल; पण त्या संदर्भातील सर्व नियम काटेकोर पालन करणे आवश्यक असल्याचे मत प्रा.बी.एस.चव्हाण यांनी व्यक्त केले.

Offline Exam Updates
समीर वानखेडेंच्या हॉटेल-बारला दिलेला परवाना रद्द

''बोर्डाने दहावी, बारावीसाठी सेमिस्टर पद्धत आणावी, म्हणजे विद्यार्थ्यांवर एकाच वेळी संपूर्ण अभ्यासक्रमाचा ताण येणार नाही. उच्चशिक्षणात सर्रासपणे सेमिस्टर पद्धतीनेच मूल्यमापन केले जाते, हे लक्षात घ्यायला हवे.''

- प्रा. ए. एस. पठाण, राष्ट्रमाता जिजाऊ कनिष्ठ महाविद्यालय, सिडको

''आयुष्यात परीक्षा न देताच सर्वकाही प्राप्त करण्याची समाजाची मानसिकता विनाशाच्या दिशेने नेणारी आहे. यासंदर्भात विद्यार्थ्यांची दिशाभूल करणाऱ्या आणि भडकावणाऱ्या समाजकंटकांविरोधात कठोर कारवाही व्हायला हवी.''

- प्रा. गोविंद शिंदे, विवेकानंद महाविद्यालय

Offline Exam Updates
दहावी-बारावीच्या परीक्षा ऑनलाइन की ऑफलाइन?

''रस्ते, बाजार, मॉल सर्वत्र गर्दी असताना परीक्षा घेण्यास नेमकी अडचण काय? सध्या मीडियावर हिंदुस्तानी भाऊच्या आंदोलनामुळे विद्यार्थी संभ्रमावस्थेमध्ये पडले आहेत. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर याचा खुलासा करावा.''

- प्रा. डॉ. सी. एस. शिंदे

''एकाच वेळी संपूर्ण महाराष्ट्रात विद्यार्थी संघटित नसताना आंदोलन होतातच कशी? यात कोणत्या राजकीय संघटनेचा छुपा पाठिंबा तर नाही ना?''

- प्रा. श्रीकृष्ण झनझन, देवगिरी महाविद्यालय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com