औरंगाबादेत आज ३०० जण कोरोनाबाधित, सात मृत्यू 

File Photo
File Photo

औरंगाबाद : औरंगाबादेत कोरोनाचा कहर लॉकडाऊनच्या काळातही वाढताच आहे. आज जिल्ह्यात ३०० जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. यात शहरातील २४३, ग्रामीण भागातील ५७ जण आहेत. 

औरंगाबाद जिल्ह्यात आज १३७ जणांना सुटी झाली. यात महापालिका क्षेत्रातील १०७ व ग्रामीण भागातील ३० जणांचा समावेश आहे. आतापर्यंत ९ हजार ७४४ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यातील ५ हजार ६३६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. 

एकुण ३७७ जणांचा मृत्यू झाला. आता ३ हजार ७३१ जणांवर उपचार सुरु आहेत. आज अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत ८१ जण पॉझिटिव्ह आले आहेत. यात सिटी एंट्री पॉइंटवरील १६ आणि मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकाने घेतलेल्या चाचणीत शहरात ६४ व ग्रामीण भागात एक रुग्ण आढळला आहे. 

आज दिवसभरात ३०० जण पॉझिटीव्ह
जिल्ह्यात ३७३१ रुग्णांवर उपचार सुरू
जिल्ह्यात एकुण ९७४४ कोरोनाबाधित आढळले.
एकुण ५६३६ रुग्ण बरे झाले.
एकुण ३७७ जणांचा मृत्यू झाला. 
-मोबाईल टीमने (टास्क फोर्स) केलेल्या अँटीजेन टेस्टमध्ये ८१ जण पॉझिटिव्ह आढळले.

सिटी एंट्री पॉइंटवर आढळलेले १६ रुग्ण - 
बजाज नगर (१), वडगाव (१), वाळूज (१), सिडको महानगर (१), पंढरपूर (१), छावणी (१), आंबेडकर नगर (१), शेंद्रा एमआयडीसी (१), टाकळी (२), द्वारका नगरी (१), भावसिंगपुरा (१), पडेगाव (२), पैठण (१) 
नक्षत्रवाडी (१) 

मोबाईल स्वॅब कलेक्शनद्वारे आलेले ६४ बाधीत 

पडेगाव (४), गुलमंडी (८), टीव्ही सेंटर (४), खोकडपुरा (५), एन चार (२), कैलास नगर (४), फायर ब्रिगेड (१), एन चार पारिजात नगर (१), रेल्वे स्टेशन परिसर (२), शिव नगर (९), सामना कार्यालय परिसर (१), छावणी परिसर (१), न्याय नगर (२२) इतर (१)

औरंगाबादेत सात जणांचा मृत्यू 
 
औरंगाबादेत कोरोनाचा कहर वाढत असला तरी आता मृत्यूदरात किंचीतशी घट दिसुन येत आहे. मृत्यूदर ३.८६ असा आहे. जिल्ह्यात आणखी सात जणांचा मृत्यू झाला. यात तीन महिला व चार पुरुषांचा समावेश आहे. मृतातील तीनजण शहरातील व चार जण ग्रामीण भागातील होते. आतापर्यंत जिल्ह्यातील ३७७ जणांचे मृत्यू झाले आहेत. 

रांजणगाव, एमआयडीसी परिसरातील ५० वर्षीय पुरुषाला घाटी रुग्णालयात ६ जुलैला भरती करण्यात आले. त्यांचा कोरोना चाचणी अहवाल ७ जुलैला पॉझिटीव्ह आला. त्यांचा १५ जुलैला दुपारी दोन वाजुन २० मिनिटांनी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांना मधुमेह व इतर व्याधी होत्या. 

पोस्ट ऑफिस परिसर, गंगापूर येथील ४५ वर्षीय पुरुषाला उपजिल्हा रुग्णालय गंगापुर येथुन घाटी रुग्णालय, औरंगाबाद येथे १४ जुलैला भरती करण्यात आले. त्यांचा कोरोना चाचणी अहवाल १५ जुलैला पॉझिटीव्ह आला. त्याच दिवशी त्यांचा दुपारी दीडच्या सुमारास मृत्यू झाला.

अयोध्या नगर, बजाज नगर येथील ५८ वर्षीय पुरुषाला घाटी रुग्णालयात ७ जुलैला भरती करण्यात आले. २८ जूनला त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचा १५ जुलैला रात्री दहाच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब व इतर व्याधी होत्या. 

हडको कॉर्नर येथील ४२ वर्षीय महिलेला घाटी रुग्णालयात ३ जुलैला भरती करण्यात आले. ४ जुलैला त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचा १६ जुलैला सकाळी पाऊने अकराच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब होत्या.

बोरगाव गणपती (ता. फुलंब्री, जि. औरंगाबाद) येथील ५८ वर्षीय पुरुषाला घाटी रुग्णालयात ६ जुलैला भरती करण्यात आले. त्याच दिवशी त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचा १६ जुलैला दुपारी बाराच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला.

 भावसिंगपुरा येथील ५६ वर्षीय महिलेला घाटी रुग्णालयात १२ जुलैला भरती करण्यात आले. १३ जूलैला त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यांचा १६ जुलैला दुपारी तीनच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांना मधुमेह होता. 

बायजीपुरा गल्ली क्रमांक ३० येथील ५४ वर्षीय कोरोनाबाधीत महिलेला जिल्हा रुग्णालयात ७ जुलैला भरती करण्यात आले. त्यांचा १६ जुलैला सायंकाळी पाचच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com