esakal | उद्यापासून मंदिराचे दार होणार खुले, मास्क लावून दुरून देवदर्शन घ्या!
sakal

बोलून बातमी शोधा

khadkeshwar.jpg

कोरोना महामारीला सुरुवात झाली आणि मार्चपासून सर्व धर्मिकस्थळे भक्तांसाठी बंद झाली. भाविकांनीही संयम दाखवत घरी राहूनच आपापल्या इष्ट देवतांची उपासना केली. आता सोमवार (ता.१६) पासून बंद असलेली मंदिरे, मस्जिदी, चर्च, विहार, गुरूद्वारा आदी धार्मिकस्थळांचे दरवाजे भाविकांसाठी खुले होणार आहेत. शहरात लहान मोठी सुमारे ५०० मंदिरे आहेत, त्यात शंभरपर्यंत मोठी मंदिरे आहेत.

उद्यापासून मंदिराचे दार होणार खुले, मास्क लावून दुरून देवदर्शन घ्या!

sakal_logo
By
मधुकर कांबळे

औरंगाबाद :  कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर बंद असलेली धार्मिकस्थळे दिवाळीतील पाडव्याच्या दिवशी उघडली जात आहेत, ही भाविक भक्तांसाठी फार मोठी भेट आहे. मंदिरांमध्ये भाविकांना दुरूनच दर्शन घ्यावे लागणार आहे, काही ठिकाणी प्रदक्षिणा मारता येणार नाही मात्र मास्क सर्वांना अनिवार्य करण्यात येणार असल्याचे मंदिर व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!


कोरोना महामारीला सुरुवात झाली आणि मार्चपासून सर्व धर्मिकस्थळे भक्तांसाठी बंद झाली. भाविकांनीही संयम दाखवत घरी राहूनच आपापल्या इष्ट देवतांची उपासना केली. आता सोमवार (ता.१६) पासून बंद असलेली मंदिरे, मस्जिदी, चर्च, विहार, गुरूद्वारा आदी धार्मिकस्थळांचे दरवाजे भाविकांसाठी खुले होणार आहेत. शहरात लहान मोठी सुमारे ५०० मंदिरे आहेत, त्यात शंभरपर्यंत मोठी मंदिरे आहेत. यामध्ये श्री गजानन महाराज मंदिर, वरद गणेश मंदिर, सुपारी हनुमान मंदिर,संस्थान गणपती, कर्णपुरा देवी मंदिर,रोकडा हनुमान मंदिर, रोकडा हनुमान बालाजी मंदिर, जळगाव रोडवरील रेणुकामाता मंदिर, जसवंतसिंगपुरा राममंदिर ,बीड बायपासवरील रेणुकामाता मंदिर,महानुभाव आश्रम श्रीकृष्ण मंदिर, दत्त मंदिर, भक्ती गणेश या मंदिरांच्या समावेश आहे,जिथे नेहमी भाविकांची गर्दी असते.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मंदिर व्यवस्थापनाकडून मंदिरांची साफसफाई करून निर्जंतुकीकीकरण करून घेतले आहे. गारखेडा परिसरातील श्री गजानन महाराज मंदिर विश्‍वस्त मंडळाचे डॉ. प्रवीण वक्ते यांनी सांगितले, शासनाने घालून दिलेल्या नियमावलीनुसार मंदिर उघडण्यात येईल. रविवारी मंदिर आणि परिसर धुवून स्वच्छ करण्यात आला. ६५ वर्षावरील भाविकांना सुरक्षेच्या कारणामुळे प्रवेश दिला जाणार नाही यासाठी त्यांनीही मंदिरात येण्याचा आग्रह धरू नये. पान -फुल, हार गाभाऱ्यात नेण्यास प्रतिबंध करण्यात येणार आहे.मास्क असल्याशिवाय कोणालाच प्रवेश दिला जाणार नाही. मंदिरात प्रवेश देण्यापूर्वी प्रत्येकाचे तापमान तपासले जाईल. सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली आहे. वरद गणेश मंदिराचे चंद्रकांत मुळे यांनी सांगितले, मंदिरात जाण्यासाठी व दर्शन घेऊन बाहेर जाण्यासाठी स्वतंत्र गेट करण्यात आले आहेत. देवाचे दुरूनच दर्शन घ्यावे लागेल मात्र प्रदक्षिणा घालता येणार नाही. सॅनिटायझरची मंदिरात व्यवस्था करण्यात आली आहे. भाविक भक्तांनी खबरदारी बाळगत मंदिरात दर्शन घेण्याचे आवाहन केले.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(Edited By pratap Awachar)

loading image