esakal | पर्यटनवाढीसाठी ‘परत एकदा चला पर्यटनाला’ अभिनव उपक्रम 
sakal

बोलून बातमी शोधा

Cave.jpg


ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ औरंगाबादचा पुढाकार 

पर्यटनवाढीसाठी ‘परत एकदा चला पर्यटनाला’ अभिनव उपक्रम 

sakal_logo
By
प्रकाश बनकर

औरंगाबाद : लॉकडाउनमुळे सहा महिन्यांहून अधिक काळापासून पर्यटनक्षेत्र बंद आहेत. यामुळे यावर अवलंबून असलेल्यांचे मोठे हाल झाले. आता अनलॉकच्या माध्यमातून देशातील काही राज्यांतील पर्यटनस्थळे खुली करण्यात आली आहे. यामुळे हळूहळू पर्यटक घराबाहेर पडू लागला आहे. पर्यटनाला चालना मिळविण्यासाठी ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ औरंगाबादतर्फे ‘परत एकदा चला पर्यटनाला’ या उपक्रमाच्या माध्यमातून पर्यटनाचा थांबलेला गाडा सुरू करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष आशुतोष बडवे, कोषाध्यक्ष अतुल गुगळे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!


श्री. बडवे म्हणाले की, पर्यटनस्थळाबरोबर धार्मिकस्थळेही सुरू करावीत, यासाठी असोसिएशनर्फे प्रयत्न केले जात आहे. औरंगाबादेतून महाबळेश्‍वर, लोणावळा, गोवा, तिरुपतीला काही पर्यटक जात आहेत. हे पर्यटन सुरक्षितता बाळगत आहेत. यासह राज्यातील पर्यटनस्थळांना भेटी देण्यासाठी पर्यटकांकडून आमच्याकडे विचारणा होत आहेत. असोसिएशनच्या माध्यामातून विशेष सवलत देत तीर्थयात्रा व पर्यटनस्थळाच्या सहली काढण्यास सुरवात केली आहे. हे करताना पर्यटकांची संपूर्ण काळजी घेतली जाणार आहे. वाहन सॅनिटायझर केले जाणार आहे. हॉटेलमध्येही सुरक्षितता पाळणार आहे. असोसिएशनकडे नोंदणीकृत असलेल्या ट्रॅव्हल्सकडूनच पर्यटनाला जावे, असे आवाहनही बडवे यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

पत्रकार परिषदेत उपाध्यक्ष सचिन कुलकर्णी, सचिव अमित जैन, मंगेश कपते, नितीन ठक्कर, कुमार दाक्षिनी, श्री.देशपांडे, पंकज कटारिया, वेदांत रत्नपारखी, झाकीर सय्यद, गौरव खंडाळकर, अझहर पठाण, सचिन देशपांडे, अंबर गांधी, अनिकेत, राहुल चोरडिया, निमेश अग्रवाल, सचिन देशपांडे, संजय, सतीश लालवाणी, अमोल बक्षी उपस्थित होते. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(संपादन-प्रताप अवचार)

loading image
go to top