esakal | यंदा घरीच साजरा होणार थर्टी फर्स्ट, रात्रीच्या संचारबंदीमुळे हॉटेल व्यावसायिकांना फटका
sakal

बोलून बातमी शोधा

0Party_2

नवीन वर्षाच्या स्वागताच्या कार्यक्रमावर कोरोनाचे सावट आहे. शहर, जिल्ह्यात २२ डिसेंबरपासून ५ जानेवारीपर्यत रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यत रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

यंदा घरीच साजरा होणार थर्टी फर्स्ट, रात्रीच्या संचारबंदीमुळे हॉटेल व्यावसायिकांना फटका

sakal_logo
By
प्रकाश बनकर

औरंगाबाद : नवीन वर्षाच्या स्वागताच्या कार्यक्रमावर कोरोनाचे सावट आहे. शहर, जिल्ह्यात २२ डिसेंबरपासून ५ जानेवारीपर्यत रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यत रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यामुळे थर्टी फर्क्टचे सेलीब्रेशन हॉटेल, रेस्टॉरंटऐवजी आता घरीच करावे लागणार आहेत. कारण हॉटेल, बार हे रात्री साडे दहा वाजता बंद करावे लागत आहेत. यामुळे व्यवसायावर परिणाम होत असल्याचेही हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजी मनगटे यांनी सांगितले.


सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षांचे उत्साह, जल्लोषात स्वागत करण्यासाठी दरवर्षी मोठी जय्यत तयारी केली जाते. हॉटेल, रेस्टॉरंट व दुकानांवर आकर्षक विद्युत रोषणाईचा लखलखाट केला जातो. तरुणाईचा बेभान जल्लोष पहाटेपर्यंत रंगतो. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नववर्षाचे सेलिब्रेशन नसणार आहे. साडेदहा वाजेनंतर संचारबंदीचे निर्देश आहेत. त्यामुळे थर्टी फर्स्टची वर्षभर वाट बघणाऱ्या हॉटेल-बार चालकांचा यावेळी मात्र, हिरमोड होत आहे. हॉटेल व्यवसाय आधीच तीस टक्क्यांवर आला आहे. त्यात यंदा थर्टीफर्स्टचा जल्लोष नाही. त्यामुळे एकही बुकींग झालेली नाही. रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आल्यामुळे व्यवसायावर मोठा परिणाम जाणवत असल्याचेही श्री.मनगटे यांनी सांगितले.राज्य उत्पादन शुल्कची राहणार मद्यपींवर नजर
थर्टी फर्स्टच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे मद्यपींवर नजर ठेवण्यात येणार आहेत. विना परवानगी मद्य पिणाऱ्यावर तसेच अवैध दारुची वाहतूक करणाऱ्यांवरही या विभागाची नजर असणार आहेत. याच काळात दरवर्षी मोठ्या कारवाई विभागातर्फे करण्यात येत असतात. यंदा रात्रीची संचारबंदी लागू असल्यामुळे शहर व जिल्ह्यातील हॉटेल,धाब्यांची तापसणी आणि कारवाई करण्यात येणार आहे. यंदाही भरारी पथक कारवाईसाठी सज्ज असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक सुधाकर कदम यांनी सांगितले.असे असेल पथक
-विभागाचे एकूण ९ स्कॉड आहेत.
-पाच नियमात पथके
-चार विशेष पथकांचा समावेश असेल.


 

Edited - Ganesh Pitekar

loading image