आजारांना दूर ठेवायचे, तर 'या' रानभाज्या ठरतील संजीवनी !

Ranbhaji.jpg
Ranbhaji.jpg

औरंगाबाद : सेंद्रीय भाज्यांकडे लोकांचा कल वाढत आहे. या सेंद्रीय भाज्या जाणीवपुर्वक उत्पादित केल्या जात आहेत. मात्र जीवनसत्वांनी परिपूर्ण असणाऱ्या रानभाज्या मोठ्या प्रमाणात शेत शिवारांमधून बघायला मिळत आहेत.

आरोग्याच्यादृष्टीने अतिशय फायदेशीर अशा तांदुळजा, काठमाट, तरवटा, कुरडू, घोळ, पालक, पाथरी, करटोली अशा चविष्ट आणि आरोग्यदायी रानभाज्यांची शहरी लोकांना ओळख व्हावी यासाठी कृषि विभागाकडून रानभाज्या महोत्सवांचे आयोजन करण्यात येत आहे. 

आहारामध्ये पालेभाज्या, फळभाज्या, कंदवर्गीय भाज्या प्रमुख घटक आहेत. सध्याच्या काळात बाजारपेठेत भाज्यांची मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. वाढती मागणी पुर्ण करण्यासाठी उत्पादन वाढले पाहिजे, यासाठी रासायनीक खतांचा वापर , रासायनिक अन्नद्रव्याचा वापर सुरू झाला. भाज्यांच्या उत्पादनात वाढ झाली मात्र त्यांची नैसर्गिक चव आणि त्यातील प्रतिकारशक्ती कमी होत आहे. काही भाज्या तर औषधी म्हणूनही वापरल्या जातात. काही भाज्या गर्भवती आणि लहान मुलांना खूप फायदेशीर आहेत. 

व्हावी शहरी लोकांना ओळख 
गटशेतीचे प्रणेते डॉ. भगवानराव कापसे म्हणाले, की रानभाज्यामध्ये टाकळा, तरोटा, तरवटा नावाने ओळखल्या जाणाऱ्या या भाजीच्या कोवळ्या पानांची भाजी केली जाते. करटोली किंवा रानकारली नावाने ओळखली जाणारी फळभाजी, ब्लेडने कापल्यासारखी लांब पानांची पाथरीची भाजी, कपाळफोडीच्या पानांची भाजी. कुर्डूची भाजी, लाल आणि हिरवट रंगाची घोळची भाजी. त्यातही मोठया पानांची आणि बारीक पानांची घोळची भाजी खायला खूप चांगली लागते. तृणधान्य आणि कडधान्यातुन पिष्टमय पदार्थ भरपुर मिळतात मात्र या भाज्यामधून जीवनस्तव आणि खनिज मुबलक प्रमाणात असतात. या रानभाज्या निसर्गात आपोआप उगवत असतात. याची ग्रामीण भागातील लोकांना आणि आदिवासींना माहिती असते. याची शहरी भागातील लोकांना ओळख व्हावी, त्यांचे आरोग्याच्यादृष्टीने फायदे कळावेत यासाठी कृषि विभागाकडून रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. 

शुद्धतेची हमी 

वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठाच्या औरंगाबाद विभागीय कृषि विस्तार शिक्षण केंद्राचे रामेश्‍वर ठोंबरे म्हणाले, रानभाज्या मानवी शरीराची पुर्ण गरज भागवतात. या भाज्या निसर्गात सहजपणे उगवत असतात त्यावर न कोणते किटकनाशक असते, न कोणते रासायनी खत त्यामुळे अस्सलता म्हणतात ती या भाज्यांमध्ये असते. गावाकडे सर्वच प्रकारच्या रानभाज्यांचा आहारात समावेश असतो म्हणुन रोगप्रतिकारशक्तीही खूप चांगली असते. शहरातील लोकांना यांची ओळख, त्या करण्याची पद्धत आणि त्यांचे गुणधर्म कळावेत यासाठी या भाज्यांचे प्रमोशन झाले पाहीजे.
Edited By Pratap Awachar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com