एक ब्राह्मण, नेक ब्राह्मणच्या घोषणांनी बीड दणाणले, महिलांचा सहभाग...

बीड शहरातील आंदाेलनात सहभागी महिला.
बीड शहरातील आंदाेलनात सहभागी महिला.

बीड - ब्राह्मण समाजाच्या विविध मागण्यांची सोडवणूक करण्याचे आश्वासन देऊनही त्याकडे सरकार दुर्लक्ष करीत आहे. या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी समाजाच्या विविध संघटनांनी बुधवारी (ता. 22) एकत्र येत धरणे आंदोलन केले. "एक ब्राह्मण, नेक ब्राह्मण' अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. 

समाजाच्या उन्नतीसाठी स्वतंत्र महामंडळाची निर्मिती करावी, समाजाला सुरक्षिततेसाठी कायदा करावा, मानधन द्यावे आदी मागण्यांसाठी समाजाने मागच्या वर्षी याच दिवशी मुंबईत आझाद मैदानावर धरणे आंदोलन केले होते. तत्कालीन सरकारने समाजाला आश्वासन दिले. परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे बुधवारी जिल्ह्यात विविध ठिकाणी आंदोलने करण्यात आली.

बीडमध्ये समाजाने एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर "जय परशुराम', "एक ब्राह्मण, नेक ब्राह्मण' असे लिहिलेल्या टोप्या परिधान करून धरणे आंदोलन केले. आंदोलनात समाजबांधवांनी घोषणाबाजीही केली. यावेळी आंदोलकांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.

आंदोलनात रवी देशमुख, समीर पाटोदकर, प्रमोद पुसरेकर, संजय खंदाट, चंद्रकांत जोशी, अशोक कडेकर, किशोर काळे, कृष्णा वांगीकर, राजेश बाभूळगावकर, भरतबुवा रामदासी, कैलास महाराज रामदासी, दुर्गादास जोशी, अशोक कुलकर्णी, अक्षय भालेराव, गजानन जोशी, विजय थिगळे, नरेंद्र होळकर, गोविंद जोशी, बाळासाहेब खडकीकर, अमोल कुलकर्णी, नीतेश कुलकर्णी, नागेश मोरे आदींसह समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com