esakal | Breaking: कोरोना लस टोचूनही दुसऱ्यांदा धनंजय मुंडे कोरोना पाॅझिटिव्ह
sakal

बोलून बातमी शोधा

Dhananjay Munde News

धनंजय मुंडे यांना जून 2020 मध्ये पहिल्यांदा कोरोना विषाणूचा संसर्ग झाला होता.

Breaking: कोरोना लस टोचूनही दुसऱ्यांदा धनंजय मुंडे कोरोना पाॅझिटिव्ह

sakal_logo
By
दत्ता देशमुख

बीड : राज्याचे सामाजिक न्याय व विशेष साहाय्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची बाधा झाली आहे. विशेष म्हणजे 11 दिवसांपूर्वी म्हणजे 12 मार्चला त्यांनी कोरोना प्रतिबंधक लशीचा पहिला डोस टोचून घेतला. धनंजय मुंडे यांनी खुद्द आपल्या ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. त्यांची प्रकृती उत्तम असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्यावर बॉंबे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.


धनंजय मुंडे यांना जून 2020 मध्ये पहिल्यांदा कोरोना विषाणूचा संसर्ग झाला होता. त्यांच्या घरातील स्वयंपाक्याच्या संपर्कातून श्री. मुंडे यांच्यासह त्यांच्या काही स्वियसहायकांना हा संसर्ग झाल्यानंतर त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यांच्या उत्तम स्वास्थ्यासाठी त्यावेळी अनेक समर्थकांनी देवाला साकडे घातले होते. दरम्यान, 24 जून 2020 ला धनंजय मुंडे उपचारानंतर बरे होऊन रुग्णालयातून बाहेर आले.

दरम्यान, सध्या त्यांचे नियमित कामे सुरू होते. या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जिल्ह्यात आल्यानंतर धनंजय मुंडे यांनी परळीत कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस देखील टोचून घेतला. जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने काही दिवस श्री. मुंडे जिल्ह्यातच होते. शनिवारी श्री मुंडे जिल्ह्याबाहेर गेले. त्यांनी मंगळवारी चाचणी करून घेतल्यानंतर त्यांना कोरोना संसर्ग झाल्याचे निदान झाले. त्यांची प्रकृती उत्तम आहे. त्यांच्यावर बॉंबे हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत.

संपादन - गणेश पिटेकर

loading image