esakal | बीड सीईओंचा नवा पॅटर्न ‘माझे गाव कोरोनामुक्त’ 
sakal

बोलून बातमी शोधा

Beed Zp 09.jpg
  •  ‘माझे कुटूंब’मध्येही बीड मराठवाड्यात अव्वल. 
  •  गावांत प्रभागनिहाय समित्या. 
  •  डिसेंबर पर्यंत गावे कोरोनामुक्त ठेवण्याचे प्रयत्न 

बीड सीईओंचा नवा पॅटर्न ‘माझे गाव कोरोनामुक्त’ 

sakal_logo
By
दत्ता देशमुख

बीड : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्याबरोबरच उपचार हेच दोन पर्याय आहेत. लस कधी, केव्हा येईल याचा पत्ता नाही. त्यामुळे तोपर्यंत मास्क, फिजीकल डिस्टन्स हीच लस आहे. त्यासाठी नुकतेच राज्य सरकारने राबविलेल्या माझे कुटूंब माझी जबाबदारीत मराठवाड्यात अव्वल असलेल्या बीड जिल्ह्यात आता ‘माझे गाव कोरोनामुक्त’ ही मोहिम सुरु होत आहे. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांच्या संकल्पनेतून ही मोहिम सुरु होत असून डिसेंबर अखेरपर्यंत गावे कोरोनामुक्त ठेवणाऱ्या समित्यांना प्रशस्तीपत्रक दिले जाणार आहे. राज्य सरकारने मागच्या महिन्यात हाती घेतलेल्या ‘माझे कुटूंब माझी जबाबदारी’ या मोहिमेत औरंगाबाद नंतर बीड जिल्ह्यात सर्वाधिक घरांचा सर्व्हे करण्यात आला. विशेष म्हणजे औरंगाबाद जिल्ह्यात औरंगाबाद शहरासाठी शहराच्या महानगरपालिकेची स्वत:ची आरोग्य यंत्रणा आहे. औरंगाबादमध्ये जिल्हा परिषदेच्या यंत्रणेसह महापालिकेच्या यंत्रणेने पाच लाख ११ हजार घरांचा सर्व्हे केला. तर, बीड जिल्ह्यात मात्र केवळ जिल्हा परिषदेच्या आरोग्य यंत्रणा व अंगणवाडी सेविका व आशांच्या माध्यमातून तब्बल चार लाख ३१ हजार कुटूंबांचा सर्व्हे करण्यात आला. विशेष म्हणजे उद्दीष्टाच्या १०४ टक्के काम बीड जिल्ह्यात झाले. यात आयलाय व सारीचे ६१३१ रुग्ण आढळून आले तर कोमॉर्बिडचे तब्बल ४९ हजार ७२१ रुग्ण आढळून आले. सदर माहिती अपलोड करण्याचे कामही ७० टक्क्यांहून अधिक आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

आता माझे गाव कोरोनामुक्त 

दरम्यान, माझे कुटूंब माझी जबाबदारी या मोहिमेच्या धर्तीवर डिसेंबरपर्यंत गाव कोरोनामुक्त ठेवण्यासाठी या मोहिमेतून प्रयत्न होणार आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्तीसह कोरोना लढ्यासाठी राबविलेले यापूर्वीचे सर्वच पॅटर्नचे सकारात्मक परिणाम आढळले आहेत. जिल्ह्यात साधारण १३०० गावे असून आतापर्यंत साडेसहाशे गावांत कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. साडेसहाशे गावे आजही कोरोनामुक्त आहेत. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.


जिल्ह्यात रुग्ण वाढले असले तरी अद्याप साडेसहाशे गावे कोरोनामुक्त आहेत. अधिकाधिक गावे या मोहिमेतून कोरोनामुक्त ठेवण्याचे लक्ष आहे. मोहिमेचा जिल्ह्याला फायदा होईल. 
- अजित कुंभार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद. 

प्रतिबंधात्मक उपाय योजनांसह विविध सर्व्हेत आरोग्य यंत्रणेसह आशा, अंगणवाडी सेविकांचे योगदान मोठे आहे. माझे कुटूंब माझी जबाबदारीचे काम समाधानकारक झाले. 
- डॉ. आर. बी. पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद. 

(संपादन-प्रताप अवचार)