Corona : बीडमध्ये संसर्ग साखळी सुरुच; आज १९ रुग्णांची वाढ

दत्ता देशमुख
Wednesday, 15 July 2020

जिल्ह्यातील कोरोना मीटर थांबायला तयार नाही. संपर्कातून संसर्गाची कोरोनाग्रस्तांची साखळी वाढतच आहे. बुधवारी (ता. १५) सहा तालुक्यांतील १९ जणांचे थ्रोट स्वॅब अहवाल पॉझिटीव्ह आले. मात्र, मंगळवारी (ता. १४) मृत्यू झालेल्या दोघांचेही स्वॅब अहवाल निगेटीव्ह आले. 

बीड : जिल्ह्यातील कोरोना मीटर थांबायला तयार नाही. संपर्कातून संसर्गाची कोरोनाग्रस्तांची साखळी वाढतच आहे. बुधवारी (ता. १५) सहा तालुक्यांतील १९ जणांचे थ्रोट स्वॅब अहवाल पॉझिटीव्ह आले. मात्र, मंगळवारी (ता. १४) मृत्यू झालेल्या दोघांचेही स्वॅब अहवाल निगेटीव्ह आले. 

पालकमंत्र्यांपासून अल्पभूधारक शेतकरी ठेवले चार हात दूर, कृषी विभागावर शेतकरी संतापले  

परळी व बीडमध्ये कोरोनाग्रस्तांच्या संपर्कातून संसर्गाची साखळी सुरुच आहे. मंगळवारी आढळलेल्या कोरोना पॉझिटीव्हमध्ये शहरातील सहा रुग्णांचा समावेश असून यातील चौघे हे कोरोनाग्रस्तांच्या संपर्कातील आहेत. तर एक महिला तालुक्यातील लिंबा येथील आहे. परळी शहरातही नवे सहा रुग्ण आढळले असून यातील पाच रुग्ण कोरोनाग्रस्तांच्या संपर्कातील असून एक स्टेट बँकेचा ग्राहक आहे. 

धक्कादायक..! औरंगाबाद प्राणिसंग्रहालयात तब्बल पाच वाघांचा मृत्यू, वाचा सविस्तर..!

गेवराईतही नव्या दोन रुग्णांत एक संपर्कातीलच आहे. आष्टीतही एकाला संपर्कातून संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. माजलगाव तालुक्यातील जदीदजवळा येथील तरुण कोरोनाबाधीत आढळून आला आहे. अंबाजोगाईत एक महिला व एक आठ वर्षीय बालकाला कोरोनाची बाधा झाल्याचे निदान झाले असून दोघेही बार्शीहून आलेले आहेत.

ही पक्षिणी होते ‘होम क्वारंटाइन’ कशासाठी वाचा...!  

दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेल्या कोरोनाग्रस्तांची संख्या २७१ झाली आहे. या रुग्णांमध्ये जिल्ह्यातील पण बाहेर जिल्ह्यात आढळलेल्या आणि बाहेर जिल्ह्यातील पण बीड जिल्ह्यात आढळलेल्या रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत १२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून १४५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या जिल्ह्यासह औरंगाबाद, पुणे, अहमदनगर, मुंबई आदी ठिकाणी ११४ जणांवर उपचार सुरु आहेत.

(संपादन प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Beed Corona Update 19 New corona positive patient