बीड : आणखी एका वृद्धाचा कोरोनाने मृत्यू, एकूण बळींची संख्या १२ वर 

दत्ता देशमुख
Tuesday, 14 July 2020

जिल्ह्यात आणखी एका कोरोनाग्रस्ताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात कोरोनाबळींची संख्या १२ झाली. अन्य एका स्वब घेतलेल्या व्यक्तीचाही मृत्यू झाला असून स्वब रिपोर्ट अद्याप आला नाही. मागील आठ दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांची साखळी वाढतच आहे.

बीड : जिल्ह्यात आणखी एका कोरोनाग्रस्ताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात कोरोनाबळींची संख्या १२ झाली. अन्य एका स्वब घेतलेल्या व्यक्तीचाही मृत्यू झाला असून स्वब रिपोर्ट अद्याप आला नाही. मागील आठ दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांची साखळी वाढतच आहे.

सावंगीत कब्रस्तानाच्या कडेला आढळली शिवपिंड; गावकऱ्यांनी हा घेतला निर्णय..!  

परळीत स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतील अधिकारी व कर्मचारी कोरोनाबधित झाल्यानंतर त्यांच्या संपर्कातील रुग्णसंख्या वाढतच आहे. यासह बीड शहरातही संपर्कातील रुग्णसंख्या वाढत आहे. जिल्ह्यात आढळलेल्या जिल्ह्यातील व बाहेर जिल्ह्यातील तसेच बाहेर जिल्ह्यात आढळलेल्या बीड जिल्ह्यातील रुग्णांची संख्या २४६ झाली आहे. यातील १३९ लोकांनी कोरोनवर यशस्वी मात केली आहे.

धक्कादायक..! औरंगाबाद प्राणिसंग्रहालयात तब्बल पाच वाघांचा मृत्यू, वाचा सविस्तर..!

दरम्यान, मंगळवारी सकाळी जिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या ७८ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला. हा रुग्ण बीड शहरातील आहे. हा जिल्ह्यातील १२ वा कोरोना बळी आहे. तर, स्वब घेतलेल्या अन्य एकाचा मृत्यू झाला असून अद्याप अहवाल आलेला नाही, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी दिली.

पालकमंत्र्यांपासून अल्पभूधारक शेतकरी ठेवले चार हात दूर, कृषी विभागावर शेतकरी संतापले  

संपादन : प्रताप अवचार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Beed Corona Update one old person death