Corona : बीड जिल्ह्यात कोरोनाचा ११ वा बळी; नऊशेंवर स्वॅब अहवालांची प्रतीक्षा

दत्ता देशमुख
Sunday, 12 July 2020

जिल्ह्यात कोरोनाचा सुरू झालेला कहर थांबायचे नाव घेत नाही. शुक्रवार-शनिवार या दोन दिवसांत २९ नवे रुग्ण आणि तीन बळी गेल्यानंतर रविवारी पुन्हा आणखी एक वृद्धेचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मागच्या तीन दिवसांतील हा चौथा बळी आणि जिल्ह्यातील कोरोनामुळे झालेला ११ वा बळी ठरला आहे. 

बीड : जिल्ह्यात कोरोनाचा सुरू झालेला कहर थांबायचे नाव घेत नाही. शुक्रवार-शनिवार या दोन दिवसांत २९ नवे रुग्ण आणि तीन बळी गेल्यानंतर रविवारी पुन्हा आणखी एक वृद्धेचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

पालकमंत्र्यांपासून अल्पभूधारक शेतकरी ठेवले चार हात दूर, कृषी विभागावर शेतकरी संतापले  

मागच्या तीन दिवसांतील हा चौथा बळी आणि जिल्ह्यातील कोरोनामुळे झालेला ११ वा बळी ठरला आहे. 
सुरुवातीच्या काळात कोरोनाशी दोन हात करत कोरोनाला जिल्ह्याबाहेर ठेवलेल्या जिल्ह्यात अलीकडे कोरोनाने चांगलाच कहर मांडला आहे. 

धक्कादायक..! औरंगाबाद प्राणिसंग्रहालयात तब्बल पाच वाघांचा मृत्यू, वाचा सविस्तर..!

बाहेरून आलेले आणि कोरोनाग्रस्तांच्या संपर्कातून संसर्ग वाढत असून आतापर्यंत जिल्ह्यात २२८ रुग्ण आढळले आहेत. विशेष म्हणजे शुक्रवारी २० तर शनिवारी नवीन रुग्ण आढळले. विशेष म्हणजे शनिवारी पाठविलेले चारशेवर आणि रविवारी पाठविलेले साडेपाचशे असे नऊशेवर स्वबचे अहवाल अद्याप येणे बाकी आहेत. 

सावंगीत कब्रस्तानाच्या कडेला आढळली शिवपिंड; गावकऱ्यांनी हा घेतला निर्णय..!  

दरम्यान शुक्रवारी बेनसुर ता पाटोदा येथील ४० वर्षीय व्यक्तीचा पुणे येथे मृत्यू झाला। तर शनिवारी याच तालुक्यातील येवलवाडी येथील रुग्णाचाही पुणे येथे मृत्यू झाला। तर उमापूर (ता पाटोदा) येथील ६० वर्षीय वृद्धाचा बीड येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला.

घरातल्या घरात तपासणीकडे वाढला कल, आरोग्याबाबत लातूरकर जागरूक   

रविवारी सकाळी बीड शहरातील किल्ला मैदान परिसरातील ७५ वर्षीय महिलेचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. जिल्ह्यातील हा ११ वा मृत्यू आहे. आतापर्यंत सव्वाशेवर लोकांना कोरोनामुक्त करण्यात यश आले आहे. 

संपादन : प्रताप अवचार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Beed corona Update one patient death waiting of nine hundread corona report