बीड जिल्ह्यात कोरोनाबळींची संख्या तीनशेपार !

दत्ता देशमुख
Sunday, 4 October 2020

  •  नवीन ११ मृत्यूची नोंद; एकूण ३०३ 
  • १५३ नवीन रुग्णांसह १०७३६ रुग्णसंख्या 

बीड : सुरवातीचे तीन महिने कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनांची कडक अंमलबजावणी व पालन करून कोरोनाला जिल्ह्याबाहेर ठेवणाऱ्या बीडमध्ये कोरोनाचे रुग्ण केव्हाच दहा हजारीपार गेले आहेत. आता कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूनेही तीनशेचा आकडा पार केला आहे. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
शनिवारी (ता. तीन) २९२ असलेली कोरोना मृत्यूची संख्या रविवारी (ता. चार) ३०३ वर पोचली. या नव्या ११ मृत्यूमध्ये या दोन दिवसांतील मृत्यूसह मागच्या काळात झालेल्या मृत्यूची उर्वरित नोंदीचा सहभाग आहे. दरम्यान, रविवारी पुन्हा एकदा नवीन १५३ रुग्णांची भर पडून रुग्णसंख्या १०७३६ झाली. रविवारी आढळलेल्या रुग्णांत सर्वाधिक ६४ रुग्ण बीड शहर व तालुक्यातील आहेत. अंबाजोगाई तालुक्यात नऊ, आष्टी तालुक्यात १०, धारूर तालुक्यात १३, गेवराईत १६, केज तालुक्यात सहा, माजलगाव तालुक्यात १०, परळी तालुक्यात १६, शिरूर कासार तालुक्यात पाच, तर, पाटोदा व वडवणी तालुक्यात प्रत्येकी नवीन दोन रुग्ण आढळून आले. या रुग्णांसह जिल्ह्याची रुग्णसंख्या १०७३६ झाली. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

आतापर्यंत ८३२२ कोरोनामुक्त 
जिल्ह्याची रुग्णसंख्या मागच्या दोन महिन्यांत झपाट्याने वाढून १०७३६ झाली. मात्र, आतापर्यंत ८३२२ रुग्णांना कोरोनामुक्त करण्यात आरोग्य विभागाला यश आले आहे. रविवारी १५२ रुग्ण कोरोनामुक्त झाले. सध्या २१११ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

आणखी ११ मृत्यूची नोंद 
शनिवारी कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूची असलेली २९२ संख्या रविवारी तब्बल ३०३ वर पोचली. सदर मृत्यू हे याच दोन दिवसातले नसून यापूर्वीही झालेले आहेत. मात्र, त्याची नोंद आता बीडच्या पोर्टलवर झाली. 

(संपादन-प्रताप अवचार)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Beed Corona Update total corona death 303