बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीची घोषणा, २० मार्चला मतदान 

सकाळ वृतसेवा 
Friday, 12 February 2021

२१ मार्चला मतदान होणार असल्याने ही बँक ताब्यात घेण्यासाठी नेत्यांची मोर्चेबांधणी सुरु झाली आहे.

बीड : वर्षभरापूर्वी मुदत संपल्यानंतर कोरोनामुळे लांबणीवर पडलेल्या बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची एकदाची घोषणा झाली आहे. यासाठी २० मार्चला मतदान होणार असून दुसऱ्याच दिवशी २१ मार्चला मोतामोजणी होऊन निकाल घोषित होणार आहे. सध्या माजीमंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखालील आघाडीच्या ताब्यात असून तत्कालीन विरोधकही याच आघाडीत आहेत. यामुळे बँकेची निवडणूक बिनविरोध होण्याचे संकेत मिळत आहेत. 

पती-पत्नीचा वेदनादायी एक्झिट, लग्न सोहळा आटोपून घरी परताना...

शेतकऱ्यांसह जिल्ह्यातील सर्वसामान्याची बँक म्हणून बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ओळख आहे. मधल्या काही काळात भ्रष्टाचाराची कीड लागल्यामुळे डबघाईला आलेल्या या बँकेची आर्थिक परस्थितीत आता कुठे हळूहळू पूर्वपदावर येत आहे. मागच्या निवडणुकीत जिल्ह्याच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी आघाडी करून ही बँक ताब्यात घेत होती. डबघाईला आलेल्या बँकेला पूर्वपदावर आणण्यासाठी बँक प्रशासनाने प्रयत्न केल्याने त्याला यश मिळाले.

तुळजाभवानी मातेचे दर्शन ठरले शेवटचे, पुण्याच्या भाविकाचा तुळजापुरात भोवळ येऊन मृत्यू

वर्षभरापूर्वी या बँकेची मुदत संपली होती; परंतु कोरोनाच्या परिस्थितीमुळे बँकेची निवडणूक लांबणीवर पडली होती. त्यानंतर बँकेच्या मतदार प्रारूप याद्या नव्याने तयार करूनच निवडणूक घेण्यात यावी. यासाठी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेचा निकाल लागल्यामुळे निवडणूक विभागाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला.

स्मार्ट सिटीत तृतीयपंथीयांना मिळणार नोकरी, आस्तिककुमार पांडेय यांचा महत्त्वाचा निर्णय

२१ मार्चला मतदान होणार असल्याने ही बँक ताब्यात घेण्यासाठी नेत्यांची मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखालील आघाडीच्या ताब्यात सध्या ही बँक असून पुन्हा बँकेवर नेतृत्व सिद्ध करण्यासाठी भाजपकडून प्रयत्न होत आहेत. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठीच्या हालचाली जिल्ह्यातील नेतेमंडळीकडून सुरु झाल्या आहेत. गतवर्षी राष्ट्रवादीत असलेले जयदत्त क्षीरसागर, सुरेश धस याच आघाडीत होते. दोन्ही बाजूंनी निवडणूक बिनविरोधसाठी प्रयत्न सुरु आहेत. 

टिक टॉक स्टार पुजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी पंकजा मुंडेंची राज्य सरकारकडे चौकशीची मागणी

असा आहे निवडणूक कार्यक्रम 
उमेदवारांचे नामनिर्देश पत्र दाखल करण्याची तारीख १५ ते २२ फेब्रुवारी, नामनिर्देश पत्राची छाननी २३ फेब्रुवारी, नामनिर्देश पत्र मागे घेण्याची तारीख २४ फेब्रुवारी ते १० मार्च दुपारी तीन वाजेपर्यंत, १२ मार्च रोजी निवडणूक चिन्हाचे वाटप, २० मार्च रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून, २१ मार्चला मतमोजणी होऊन निकाल घोषित करण्यात येणार आहे. 

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Beed District Cooperative Bank Election Dates Declared Beed Latest News