esakal | सोयाबिनची सुडी फेटविली, लाखोंचे नुकसान, सहा जणांवर गुन्हा 
sakal

बोलून बातमी शोधा

crime.jpg
  • बीड जिल्ह्यातील विविध घटना, 
  • शेतातील सोयाबिन टाकली जाळून. 
  • प्राध्यापकालाही चाकू लावून लूटले. 

सोयाबिनची सुडी फेटविली, लाखोंचे नुकसान, सहा जणांवर गुन्हा 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बीड : काढणी करून मळणीसाठी ठेवलेले चार एकर क्षेत्रातील सोयाबीनचे एक लाख रुपयांचे पीक जाळल्याचा प्रकार कोठी (ता. केज) शिवारात घडला. या प्रकरणी केज पोलिस ठाण्यात सहा जणांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

कोठी येथील लवण शिवारात किसन ज्ञानोबा डोंगरे यांनी शेतातील एक लाख रुपये किमतीच्या सोयाबीन पिकाची कापणी करून मळणीसाठी काढून ठेवले होते. सोमवारी सायंकाळी गावातीलच श्रीहरी मोहन डोंगरे, सविता श्रीहरी डोंगरे, ऋषीकेश श्रीहरी डोंगरे, शंकर भाऊराव डोंगरे व सुखमला शंकर डोंगरे यांनी संगनमत करून सोयाबीन जाळून टाकल्याचे अलका डोंगरे यांनी केज ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. यावरून वरील सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. बाळकृष्ण मुंडे तपास करीत आहेत. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

चाकूचा धाक दाखवून प्राध्यापकास लुटले 

मित्रासोबत रात्री फिरायला गेलेल्या प्राध्यापकास दुचाकीवरून आलेल्या तिघांनी चाकूचा धाक दाखवून लुटले. ही घटना पालवण शिवारातील रेल्वे पुलाजवळ घडली. याप्रकरणी सोमवारी (ता. पाच) तीन जणांविरुद्ध बीड ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

अमोल रोहिदास वाघमारे (रा. संत नामदेवनगर) असे लूट झालेल्या प्राध्यापकाचे नाव आहे. अमोल वाघमारे हे मित्रांसोबत पालवण शिवारातील रोडने रेल्वे पुलाकडे फिरायला गेले. परत येत असताना दुचाकीवरून आलेल्या तीन चोरांनी त्यांना अडविले. अमोल वाघमारे यांना चाकूचा धाक दाखवून गळ्यातील सोन्याची साखळी, मोबाईल व रोख रक्कम असा एकूण दोन लाख ३३ हजार २३८ रुपयांचा मुद्देमाल बळजबरीने काढून घेतला. त्यानंतर चोरांनी धूमस्टाइल पोबारा केला. अमोल वाघमारे यांनी सोमवारी याबाबत फिर्यादी दिली. सहायक पोलिस निरीक्षक योगेश उबाळे तपास करीत आहेत.