Breaking news : नेहमी माहेरी येते म्हणून बापनेच केला...तिचा..!

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 2 July 2020

मुलीचे वय अवघे १४ वर्ष. त्या बापाने तिचा बालविवाह केला. मात्र लेक वेळोवेळी माहेरालाच येते. अनेक वेळा समजावून सांगितले मात्र ऐकत नाही. म्हणून बापाने तिचा गळा दाबून तिच्या आयुष्याची दोरी कापली. 

वडवणी (जि. बीड) : मुलीचे वय अवघे १४ वर्ष. त्या बापाने तिचा बालविवाह केला. मात्र लेक वेळोवेळी माहेरालाच येते. अनेक वेळा समजावून सांगितले मात्र ऐकत नाही. म्हणून बापाने तिचा गळा दाबून तिच्या आयुष्याची दोरी कापली. तिला मारून टाकले आता चिंताच मिटली जणू. त्यानंतर तिचा मृतदेह उसाच्या शेतात नेऊन टाकला. ही ह्र्दय पिळवटून टाकणारी घटना घडली बीड जिल्ह्यातील चिखलबीड गावात. या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. 

पालकमंत्र्यांपासून अल्पभूधारक शेतकरी ठेवले चार हात दूर, कृषी विभागावर शेतकरी संतापले  
 

तालुक्यातील चिखलबीड येथील शितल दादासाहेब तोगे (वय १४) ही अल्पवयीन  विवाहिता गेल्या दोन दिवसांपासून घरातून बेपत्ता होती. शोधाशोध केल्यानंतर तिचा मृतदेह तिचे माहेर असणाऱ्या पिंपळा शिवारात एका उसाच्या शेतात सापडल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली होती.  शवविच्छेदनाच्या अहवालानुसार अल्पवयीन विवाहितेचा गळा दाबून खून केल्याचे निष्पन्न झाले होते. या घटनेत वडवणी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. 

धक्कादायक..! औरंगाबाद प्राणिसंग्रहालयात तब्बल पाच वाघांचा मृत्यू, वाचा सविस्तर..!

मात्र पित्यानेच लेकीचा खून केल्याचे पोलीस चौकशीत समोर आले आहे. नेहमी माहेरी येते म्हणून वैतागलेल्या पित्याने आई समोरच  अल्पवयीन विवाहितेचा गळा दाबून खून केल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे.  या प्रकरणाचा सहाय्यक पोलीस निरीक्षक महेशकुमार टाक यांनी अवघ्या चोवीस तासात उलगडा केला असून आरोपी पित्याला  पोलिसांनी अटक केली आहे.

सावंगीत कब्रस्तानाच्या कडेला आढळली शिवपिंड; गावकऱ्यांनी हा घेतला निर्णय..!  

सासर माहेर होते पाच किमी अंतर 
अल्पवयीन मुलीचा विवाह साधारण एक वर्षांपूर्वी झाला होता. अर्थात शाळा, महाविद्यालयात जाण्याच्या या वयात तिचा विवाह झाला. त्यामुळे साहजिकच माहेरचा लळा तिला असणारच. अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या बापाच्या घरी तिचे नेहमीच येणे जाणे असायचे. आणि हाच विषय तिच्या आयुष्यचा कर्दनकाळ ठरला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Beed district crime news father murder to her baby