शेतकऱ्याच्या मेहनतीला आले फळ, डाळींबाच्या उत्पन्नाने मारली पंच्चाहत्तर लाखांची मजल !

dalinbh.jpg
dalinbh.jpg

माजलगाव (बीड) : मराठवाडा म्हटले की, दुष्काळी आणि मागासलेपणाचा लागलेला शिक्का. त्यात यंदा कोरोनाचे सावट म्हटल्यावर काहीच खरं नाही. मात्र, अशा भयावह परिस्थितीत देखील माजलगावच्या एका शेतकर्याने अथक परिश्रमातून डाळींबाचे लाखो रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. एका तपापासून जोपासलेला भगवा डाळींबाने यंदा चेन्नईच्या बाजारात मजल घेतली असून डाळींबाची थेट बांधावरून विक्री होत आहे. हे विशेष. 

माजलगाव येथील शेतकरी शरद किशनराव नाईकनवरे यांची शेलापूरी, हनुमान नगर आणि सावरगाव या ठिकाणी पन्नास एकर शेती आहे. पारंपारिक पिकांसोबतच त्यांनी बागायती शेती देखील जोपासलेली आहे. या बागायती शेतीमध्ये त्यांनी मागील दहा वर्षांपूर्वी आठ एकर, सहा वर्षांपूर्वी ८ एकर तर मागील पाच वर्षांपूर्वी पुन्हा बारा एकरामध्ये असे पूर्ण मिळून २८ एकरामध्ये भगवा डाळींबाची १४ बाय ९ अंतरावर लागवड केली आहे. 

वेळोवेळी केलेल्या फवारणी, यशस्वी कापणी व ठिबकाव्दारे योग्य नियोजन करून दिलेल्या पाण्यामुळे डाळींब बाग जोमात बहरला होता. या बागेतील एका डाळींबाचे वजन जवळपास अर्धा किलोच्या वरीच आहे. डाळींब चविष्ट व दिसायला देखिल आकर्षक असल्याची माहीती मिळाल्यावर चेन्नईच्या व्यापा-यांनी थेट बांधावर येत या पूर्ण बागेची खरेदी केली आहे. १५० टन डाळींब भरले असुन यातुन या शेतक-यास जवळपास ७५ लाख रूपयांचे उत्पन्न मिळाले असल्याने कोरोना काळातही या शेतक-यास मोठे उत्पन्न मिळाले असल्याने दिलासा मिळाला आहे. 

आजचा तरूण वर्ग हा शेती असतांना देखिल नोकरीच्या मागे धावतांना दिसत आहे. युवकांनी नौकरीच्या मागे न लागता शेती व्यवसाय व्यापारी पध्दतीने केल्यास निश्चीतच फायदेशीर आहे. शेतामध्ये उपलब्ध असलेल्या पाण्याचे योग्य नियोजन करून पारंपारिक शेतीसोबतच आधुनिक पध्दतीने फळबाग लागवड केल्यास आर्थिक क्रांती होऊ शकते. वकीलीचे शिक्षण घेतले असले तरी वकीली व्यवसाय न करता शेती उद्योग जिद्दीने सांभाळत डाळींब बाग यशस्वी केली असुन मागील दहा वर्षांपासुन या डाळींब बागेतुन लाखो रूपयांचे उत्पादन काढण्यात यश आले आहे. - श्री. शरद नाईकनवरे, शेतकरी.

(संपादन -प्रताप अवचार)
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com